Team Agrowon
AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी क्रांती झाल्याचे पाहायला मिळते.
या नव्या तंत्राच्या मदतीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होताना दिसत आहेत.
AI च्या मदतीने कलाकार डिजिटल माध्यमामध्ये काम करत कलाकृती तयार करत आहेत.
सोशल मीडियावर सध्या असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. अगदी खरे वाटणारे फोटो या तंत्राद्वारे बनवले जात आहे.
आता अमित वाघमारे या आर्टिस्टने राष्ट्रवादी नेते कसे दिसतात हे AI च्या मदतीने दाखवले आहे.
डिस्ने कार्टुन स्टाईलमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड दिसत आहेत.