महारुद्र मंगनाळे
इथून पाय निघता निघत नाही...निघणं टाळता येईल का? याचा कसोशीने प्रयत्न होतो...पर्याय नाहीच असं लक्षात आलं की,निघावंच लागत.
जगण्यातला व्यवहार ज्या दिवशी संपेल तेव्हाच हे इच्छेविरुद्धचं जगणं संपेल! झाडांना, वेलींना चालता येत असतं तर ते मला बसस्थानकापर्यंत सोडायला आले असते.
एखादं दुसरं रोपटं बॅगेत घुसून सोबतही आलं असतं. मोगरा आणि चाफ्याची फुल त्यांचा सुगंध थेट ह्दयात सोडतात..
दरवेळी हट सोडताना मी भावूक होतोच पण सगळी झाडंही माझ्यासारखीच हळवी झाल्याचा भास मला होतो.
मला वाटतं, त्यांनाही माझ्या सोबत यायचंय..शेवटी भास आणि वास्तव यातली सीमारेषा फारच पुसट असते... स्वप्न...वास्तव वाटतात तसंच हे असावं!
आज निघताना दोन्ही कुत्र्यांना मुद्दाम पिंजऱ्यात टाकलं.बगिरासोबत डोडोही नदीपर्यंत सोडायला येईल म्हणून.डोडो तर असं बघत होता की.... खरं तर...यासुध्दा बेड्याचं आहेत...पण हव्या हव्याशा बेड्या.जगणं आनंददायी, समृद्ध करणाऱ्या!