Team Agrowon
नव्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचे नेते धनंयज मुंडे यांच्याकडे कृषीमंत्रीपद सोपवण्यात आलं आहे.
सध्या मराठवाड्यातील अनेक भागात सोयाबीन आणि कपाशीवर गोगलगायींनी हल्ला चढवला आहे.
त्यांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडचा दौरा केला आणि थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले
त्यांनी परळी वैद्यनाथ तालुक्यातील बेलंबा, वाघबेट शिवारातील गोगलगायींनी बाधित सोयाबीन, कपाशी आदी पिकांची पाहणी केली.
याशिवाय गोगलगायींना नष्ट करण्यास उपयुक्त असणारी औषधे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कृषी विभागास उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.
गोगलगायींमुळे होत असलेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे केले जावेत, याबाबत संबंधितांना आदेश दिले आहेत.
तसेच पावसाचे प्रमाण कमी असून शेतकऱ्यांना दुबार पेरणीची गरज भासल्यास किंवा अन्य कोणत्याही अडचणीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहील. असं आश्वासन दिलं