Anuradha Vipat
दुपारची झोप घ्यावी की नाही, हे पूर्णपणे तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवर आणि वेळेवर अवलंबून असते.
१० ते २० मिनिटांची छोटी डुलकी घेतल्याने मेंदू ताजेतवाने होतो आणि कामातील एकाग्रता वाढते.
दुपारी थोडा वेळ झोपल्याने माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता सुधारते.
दिवसभराच्या धावपळीनंतर छोटी झोप घेतल्यास मानसिक थकवा दूर होतो आणि मूड सुधारतो.
जर तुम्ही १ तासापेक्षा जास्त झोपलात, तर उठल्यावर तुम्हाला जास्त सुस्ती जाणवू शकते.
दुपारी उशिरा किंवा जास्त वेळ झोपल्यास रात्री वेळेवर झोप येत नाही.
दुपारी रोज तासनतास झोपल्याने चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे वजन वाढू शकते.