Mahesh Gaikwad
स्त्रिया या आपल्या केसांच्या आरोग्याप्रती खूपच जागरूक असतात. पण आजकाल केस गळणे, केस पातळ होणे, डॅन्ड्रफ होणे किवा केस पांढरे होणे यासारख्या समस्या सामान्य झाल्या आहेत.
केसांच्या समस्यांसाठी बाजारात महागडे शॅम्पू, कंडिशनर उपलब्ध आहे. परंतु केसांच्या अशा समस्या घरच्या घरी काही नैसर्गिक उपाय केले जाऊ शकतात.
आठवड्यातून दोन-तीन वेळा कोमच केलेल्या नारळ तेलाने केसांच्या मुळांमध्ये मालिश करा. यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळण्याचे प्रमाणही कमी होते.
रात्रभर भिजवून ठेवलेल्या मेथी दाण्यांची सकाळी पेस्ट करून केसांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवा. नियमित लावल्यास केसांतील डॅन्ड्रफ कमी होवून केस मऊ होतात.
जास्वंदाची फुले आणि पाने बारीक वाटून तेलामध्ये चांगली उकळून घ्या. हे तेल नियमित केसांना लावल्या केस दाट आणि मजबूत होतात आणि मुलायम होतात.
कढीपत्त्याची पाने नारल तेलामध्ये उकळून थंड करा. कढीपत्त्याचे तेल केसांना लावल्यामुळे केस नैसर्गिक काळे आणि चमकदार होतात.
कोरफडीचा ताजा गर केसांना लावून अर्ध्या तासाने केस धुवून टाका. यामुळे डोक्याची त्वचा थंड राहते. तसेच खाज आणि डॅन्ड्रफ कमी होतो.
कांद्याचा रस थेट केसांच्या मुळांना लावा. अर्ध्या तासाने सौम्य शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसांची गळती कमी होण्यास मदत होते. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.