Team Agrowon
सातपुडा रांगांमधील आदिवासी महिला, शेतीचा शोध लावणाऱ्या आदिमाता निरुत्ती, याहा मोगी देवमोगरा यांच्या लेकी मोठया संख्येने 20 नोव्हेंबरला जळगाव जामोद येथे एकत्रित आल्या होत्या
आपापल्या अतिदुर्गम भागातून 200 किलोमिटर अंतर पार करून आपापल्या संस्कृतीची प्रतीके घेऊन खास पारंपारिक पेहराव करून ढोलाच्या गजरात आपल्या जल, जंगल, जमिनींवरील हक्क आणि आपल्या अस्मितेच्या संरक्षणासाठी सामूहिक ऊलगुलानचा नारा देत या महिला एकत्रित आल्या होत्या
"संविधान के सन्मान मे आदिवासी महिला मैदान मे"!!चा एल्गार पुकारत "बायऱ्या बायऱ्या लढणाऱ्या - नवनिर्माण करणाऱ्या !! च्या घोषणा बुलंद करत राहुल गांधीजींच्या भारत जोडो पदयात्रेला समर्थन देण्यासाठी या यात्रेच्या महाराष्ट्रातील शेवटच्या दिवशी विराट आदिवासी महिला मेळावा संपन्न झाला
या मेळाव्यात।आपली भूमिका जाहीर करतांना या देशाचे संविधान सुरक्षित राहिले तर आदिवासींच्या हक्कांची लढाई ही जिवंत राहील म्हणून भारत जोडो यात्रा महत्वाची आहे हा संदेश दिला गेला
आजच्या या अस्थिरतेच्या काळात जेव्हा या देशाची घटनाच धोक्यात आली आहे अश्या काळात आम्ही आदिवासी महिला या देशाच्या खऱ्या घटनात्मक मूल्यांच्या संरक्षणासाठी उभ्या राहणाऱ्या राहुल गांधीं सोबत आहोत ही भूमिका जाहीर केली गेली