Aslam Abdul Shanedivan
आपल्याकडे अनेकांना तोंडात खाऊचे पानं टाकण्याची सवय असते. तर अनेक जेवणानंतर पानं खातात.
गोड पान, साधे पान, मसाला पान किंवा सुपारीचे पान असे खाऊच्या पानांचे अनेक प्रकार आहेत. तर याच्या सेवनामुळे अनेक आरोग्य समस्या कमी होऊ शकतात.
खाऊच्या पानात टॅनिन, प्रोपेन, अल्कलॉइड्स आणि फिनाइल सारखे अनेक पोषक घटक असल्याने याचा उपयोग औषध म्हणून आयुर्वेदात केला जातो
आयुर्वेदानुसार खाऊची पाने चघळल्याने शरीरातील युरिक ॲसिड नियंत्रित राहते.
खाऊची पाने शरीरात ग्लुकोजच्या पातळीचे व्यवस्थापन करण्यास मदत करतात. जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे
शरीरात दुखापत झाल्यास खाऊच्या पाने लेप म्हणून लावण्यासह खाल्ल्यास जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
खाऊच्या पानांमध्ये अँटी-कॅन्सर तत्वांसह कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करणारे घटक असतात. यामुळे हृदयाच्या आरोग्य चांगेल राहण्यासह कर्करोगाचा धोका कमी होतो (अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या)