Healthy Food : आली थंडी..बदला आहार !

Team Agrowon

भारतीय हवामानात पावसाळा, हिवाळा व उन्हाळा हे ऋतू मुख्य मानले जातात. निसर्गाचे चक्र जसे बदलते, तसे ऋतूंची नजाकत अनुभवता येते. पावसाळा संपून काही कालावधी लोटला आहे.

आतापर्यंत हिरव्यागार शिवारात पिवळे तांबूस रंग विखुरलेले आहेत. रस्त्याच्या कडेला असणारे गावात सुकून पिवळे पडले आहे. संपूर्ण शिवाराचा रंग सोन्यासारखा सोनेरी बनला आहे.

शेतकऱ्यांच्या कापण्या यंदा व्यवस्थित पार पडल्या. मळणी-झोडणीसाठी तयार झालेली पिके सुद्यांमध्ये रचून वावरात विखुरलेली दिसतात. हिरव्यागार शेणाने सारवलेल्या खळ्यावर माणसांची-बैलांची लगबग सुरु आहे.

रानात कंदवर्गीय वनस्पतींची पाने पिवळी होऊन सुकली देखील. आता हे कंद जमिनीतून बाहेर काढण्याची घाई सर्वांनाच झाली आहे. करांदे, कानफळ, चाई, गोधडी कंद अशी चिक्कार उपलब्धता या दिवसात असते.

डिसेंबर-जानेवारी हा रानातले कंद खणण्याचा हंगाम. घराघरात ते साठवून ठेवून वर्षभर खाल्ले जातात. असा हा हिवाळा सुरु होतो तेव्हा रानातले बदल जाणवू लागतात. यंदा तशी थंडी येत-जाती असली तरी शेतात तिचे प्रमाण जाणवत आहे. 

ऋतूनुसार आपली आहारचर्या ठरलेली आहे. वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम आपल्या शरीरावर देखील होत असतो. शरीराचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी अन्न हे महत्वाची भूमिका निभावते, हे आपण जाणतोच.

शरीर मजबूत बनवायचे असल्यास हा योग्य काळ मनाला जातो. या काळात भूक वाढते व अन्नपचन देखील नीट होते. शिवाय वाढलेल्या गारव्यामुळे शरीराला पोषक असणारे घटक, शरीरात स्निग्धता व उष्णता निर्माण करणारे अन्न घटक सेवन करणे योग्य मानले जाते.

cta image | Agrowon
क्लिक करा