Wedding Gift : शेतकऱ्याचा नादचं खुळा ! कृषी संस्कृती जपत लग्नात दिला अनोखा आहेर

Team Agrowon

आहेराची सुरेख मांडणी

सुकेणे (ता. निफाड) येथील शेतकरी श्‍यामराव मोगल यांनी मित्राच्या मुलीच्या लग्नात देशी गाय, विषमुक्त अन्न-धान्यांसह ११ प्रकारचा भाजीपाला, ५ किलो गूळ, देशी गाईचे तूप, पिवळी व लाल जास्वंद, चाफा, प्राजक्त अशी फुलझाडे, तुळस यांसह ३१ प्रकारची विविध देशी झाडे, दगडी जाते, रांजण भेट दिला आहे.

Wedding Gift | Mukund Pingale

ऋतुजा व प्रसाद यांचा लग्नसोहळा

मोगल यांचे मित्र श्याम काठे यांची कन्या ऋतुजा व प्रसाद यांचा लग्नसोहळा नुकताच नाशिक येथे झाला. एकीकडे महागड्या गाड्या, मोटरसायकली तर घरातल्या वस्तू या भेट स्वरूपात देण्याची पद्धत पडत आहे. त्यास मोगल यांनी फाटा दिला.

Wedding Gift | Mukund Pingale

आहेर ठेवण्यासाठी मांडवात खास दालन

मांडवात हा आहेर ठेवण्यासाठी त्यांनी ज्वारी व बाजरीच्या कडब्याचा वापर करून आकर्षक दालन बनविले होते.

Wedding Gift | Mukund Pingale

उपक्रमाचे कौतुक

आहेर पाहण्यासाठी लग्नानिमित्त उपस्थित असलेले सह्याद्री फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, आमदार सीमा हिरे, माजी आमदार अनिल कदम, माणिकराव बोरस्ते, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते डॉ. सुनील मोरे यांनी भेट देत या उपक्रमाचे कौतुक केले.

Wedding Gift | Mukund Pingale

शेतीमातीच्या सान्निध्यातील जीवनशैली पुन्हा रुजावी

आजी-आजोबांच्या काळात अशा गोष्टींचा वापर होता. त्यामुळे पूर्वीची पिढी निरोगी आयुष्य व आनंदी जीवन शेतीमातीच्या सान्निध्यात जगली. हाच आदर्श व हीच जीवनशैली पुन्हा रुजावी, यासाठी हा छोटा प्रयत्न होता.

Wedding Gift | Mukund Pingale

आहेर म्हणून लग्नात काय - काय दिले

लग्नात वारेमाप खर्च करू नये. त्यातून पैशांची उधळपट्टी आणि काही प्रमाणात कर्जबाजारीपणा थांबेल.

Wedding Gift | Mukund Pingale

सेंद्रिय शेती करणारे मोगल

मोगल हे सध्या १९ एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. यापूर्वी मोगल यांनी त्यांच्या भाचीच्या लग्नातही अशाच प्रकारे शेतीसंबंधी साधने भेट दिली होती.

Wedding Gift | Mukund Pingale
Vegetable Market | Agrowon
आणखी पाहा...