Summer Heat : उन्हात थंडावा देणारे माठ आणि त्यांचं गाव

Team Agrowon

वाळा म्हटले की उन्हाळ्याच्या दिवस आठवतात. माठ किंवा पिंपातील पाण्यात वाळा टाकला जातो. ते सुगंधी पाणी प्यायल्यास तहान भागते आणि थंडावा मिळतो.

Summer Heat | Shadab Shaikh

वाळ्याची मुळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. वाळा थंड गुणात्मक असल्यामुळे पित्तशामक विशेषतः ‘आग’ कमी करतो. 

Summer Heat | Shadab Shaikh

उन्हाळ्यात खूप घाम येणे सामान्य आहे. मात्र काहींना पित्तामुळे जास्त प्रमाणात येतो. अशावेळी वाळा पावडर उटण्याप्रमाणे अंगास लावावी.

Summer Heat | Shadab Shaikh

त्वचेवर काही कारणांनी लालसरपणा येतो. कीटक चावल्यामुळे आग होते. त्यावेळी चंदन आणि वाळा यांचा लेप लावावा. आग कमी होण्यास मदत होते.

Summer Heat | Shadab Shaikh

तिखट जेवण, पित्तप्रकृती यामुळे शौचास पातळ होऊन आग होते. अशावेळी वाळा, धने, नागरमोथा, बेल यांचा काढा घ्यावा. 

Summer Heat | Shadab Shaikh

घशात कोरड पडणे, ओठ कोरडे पडणे ही लक्षणे तीव्र तापामध्ये जाणवतात. अशावेळी वाळा, चंदन, नागरमोथा, सुंठ यांचे मिश्रण करावे. ते मिश्रण अर्धा चमचा प्रमाणात पाण्यात उकळून घ्यावे. थंड झाल्यावर थोडे थोडे सेवन करावे.

Summer Heat | Shadab Shaikh
Flamingo | Agrowon