Mango Season: बांधावर उगवलेल्या आंब्याचं झाड!

महारुद्र मंगनाळे

चार वर्षांपूर्वी विहिरीच्या बाजुला हा आणि याच बंधाऱ्यावर इतर तीन आंब्यांची रोप लावली होती.यातील दोन वर्षभरातच वाळली.एक आंबा मोठा होऊन अडिच वर्षांनंतर अचानक वाळला.

Mango Season | Maharudra Mangnale

एकमेव आंबा टिकला

विहिरीवरील हा एकमेव आंबा टिकला. छान वाढला.गतवर्षी तीन-चार आंबे लागले होते.शेवटपर्यंत एकही टिकला नाही.त्यामुळं चवही कळली नाही.

Mango Season | Maharudra Mangnale

आंब्याला मोहोर

यावर्षी या आंब्याला मोहोर लागल्याचं मला दिसलं नाही.विहिरीलगतच हा आंबा असल्याने, इथं दिवसभरात चार-पाच चकरा होतात.सकाळी मी मोटार बंद करण्यासाठी विहीरीवर आलो.

Mango Season | Maharudra Mangnale

आंब्याच्या वाढीला अडथळा

तेवढ्यात तिथं नरेशही आला. या आंब्याच्या वाढीला अडथळा ठरत असलेली चार सीताफळाची झाडं,एक छोट कडुलिंबाचं झाड आणि काही फांद्या काढ,असं मी सांगत होतो..आणि अचानक नरेशचं आणि माझं या आंब्यांवर लक्ष गेलं..

Mango Season | Maharudra Mangnale

मामा,बघा तीन आंबे आहेत याला.बघून मीही चकीत झालो..मी म्हटलं, इतक्या दिवसात आपल्याला कसे काय दिसले नाहीत हे आंबे?

Mango Season | Maharudra Mangnale

त्याचे फोटो काढून सध्या रुद्रा हटवर असलेल्या एखाद्या आंब्याशी हा जुळतो का बघितलं.बहुतेक वेगळा दिसतोय... कदाचित चार वर्षांपूर्वी वाळलेल्या मारूतीच्या आंब्याचं तर हे रोप नसेल? ... नक्की नाही सांगता येणार.

Mango Season | Maharudra Mangnale
Animal | Agrowon