Team Agrowon
देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय, पुणे येथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच थारपारकर जातीच्या कालवडीचा जन्म संकरित गायीच्या माध्यमातून झाला आहे.
हा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला गेला आहे.
प्रयोगशाळेमध्ये थारपारकर १३३ नंबरची दातागाई वापरली असून तिची दूध उत्पादन क्षमता प्रतिवेत ३२९३ किलो आहे
दाता वळू म्हणून थारपारकर फेथफुल नावाचा वळू वापरला असून वळूच्या आईचे दूध उत्पादन प्रतिवेत ३००५ किलो आहे
उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरित्या स्त्री बीज मिळवून त्यांचे प्रयोग शाळेत चांगला अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे
हा भ्रूण प्रयोगशाळेतून तयार करून सात दिवसानंतर देशी गाई संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये असलेल्या PT 80 या संकरित गायीमध्ये प्रत्यारोपण केला आहे.
शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रायोगिक तत्वावरती वापरण्यास सुरुवात केली असून या प्रकल्पांतर्गत सुमारे १५० पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे.