World Agri Tourism Day : कृषी पर्यटनातून कोकणी संस्कृतीची झलक

Team Agrowon

कृषी पर्यटन

गणेश रानडे यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत शेतीत प्रयोगशील वृत्ती जपत कृषी पर्यटन केंद्र सुरू केले आहे.

World Agri Tourism Day | Agrowon

निसर्गरम्य किनारा

नाटे गावाला समुद्र किनाऱ्याचे वरदान आहे. काही अंतरावर आंबोळगडचा निसर्गरम्य किनारा आहे.

World Agri Tourism Day | Agrowon

पर्यटन केंद्राचा विस्तार

समुद्र किनाऱ्यापासून दोन किलोमीटवर केंद्र वसले आहे. गेल्या चौदा वर्षांच्या काळात अनुभव, भांडवल, पर्यटकांच्या गरजा यानुसार केंद्राचा टप्प्याटप्प्याने विस्तार केला आहे.

World Agri Tourism Day | Agrowon

मचाण

कृषी पर्यटन केंद्रात उंचावर मचाण तयार केले आहे. तेथून संध्याकाळी सूर्यास्त व त्यानंतर चौफेर परिसर अनुभवणे ही पर्वणीच असते.

World Agri Tourism Day | Agrowon

हापूस आंबा

शहरातील लोकांना खेड्यातील जीवन अनुभवता येत नाही ही बाब लक्षात घेऊन पर्यटकांना झाडावर चढून आंबा तोडणे व खाणे या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो.

World Agri Tourism Day | Agrowon

आंब्याची काढणी

आंब्याची काढणी, ग्रेडिंग, पॅकिंग कसे केले जात याची माहिती दिली जाते. त्यातून बागायतदारांना येणाऱ्या समस्यांचे आकलन देखील पर्यटकांना होते.

World Agri Tourism Day | Agrowon

कोकणी जेवण

आपल्याच बागेत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली ताजी भाजी पर्यटकांना खाऊ घालणे हा वेगळा आनंद असतो. शुद्ध शाकाहारी जेवण मिळते.

World Agri Tourism Day | Agrowon
World Agri Tourism Day | Agrowon