Cumin Masala : जिऱ्याची फोडणी सामान्यांच्या खिशाला देणार चटका, ८०० रूपये किलो जिरा

sandeep Shirguppe

जिरा महत्वाचा मसाला

जेवणातील कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना जिरा महत्वाचा मसाला म्हणून वापरला जातो. परंतु पूढच्या काही महिन्यात जिऱ्याचा तडका सामान्यांच्या खिशाला असह्य होणार आहे.

Cumin Masala | agrowon

जिरा दर वाढण्याची भिती

गुजरात, राजस्थान, तुर्कस्थान, सिरिया या मध्यपूर्व देशांमध्ये जिऱ्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे दिवाळीपर्यंत जिरा एक हजार रुपये किलो होण्याची शक्यता आहे.

Cumin Masala | agrowon

भारतासह अनेक देशात लागवड

जिऱ्याची लागवड प्रामुख्याने भारत, तुर्की, सीरिया, संयुक्त अरब अमिराती, इराण, इजिप्त, पाकिस्तान, इटलीमध्ये केली जाते.

Cumin Masala | agrowon

जिरा ८०० रुपये किलो

सध्या जिरा हा ८०० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. परंतु पुढच्या ५ महिन्यात भारतीय संस्कृतील मोठे सण येणार असल्याने जिऱ्याची फोडणी महाग होणार आहे.

Cumin Masala | agrowon

गुजरात आणि राजस्थानमध्ये उत्पादन

देशात राजस्थानमधील बारमेर, जोधपूर, जोलोरे, जैसलमेर, नागौर तर गुजरातमधील सुरेंद्रनगर, बनास्कांता, पाटण, कच्छ, जुनागढ आदी भागात जिऱ्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

Cumin Masala | agrowon

वेगवेगळ्या जाती

सीजी-५, सीजी-४, सीजी-३, सीजी-२, सीजी-१ हे वाण गुजरातमध्ये, तर आरझेड-३४५, आरझेड- ३४१, आरझेड-२२३, आरझेड-२०९, आरझेड-१९ हे जिऱ्याचे वाण देशभरात सगळीकडे वापरले जाते.

Cumin Masala | agrowon

गुजरातमध्ये सर्वाधिक उत्पादन

भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात जिऱ्याचे उत्पादन गुजरातमध्ये घेतले जाते. उर्वरित उत्पादन राजस्थानमधून येते.

Cumin Masala | agrowon

गुजरात आणि राजस्थानमध्ये ९९ टक्के उत्पादन

गुजरात आणि राजस्थान मिळून देशातील सुमारे ९९ टक्के जिरे उत्पादन करतात. इतर राज्ये नगण्य प्रमाणात उत्पादन करतात.

Cumin Masala | agrowon
ujani-dam | Agrowon