Roshan Talape
1 एप्रिल 2025 पासून निष्क्रिय मोबाईल नंबर लिंक असलेल्या बँक खात्यांसाठी UPI व्यवहार बंद होणार आहेत.
नवीन आयकर नियम 2025 पासून लागू होणार आहेत, ज्यामध्ये वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त ठरले आहे. परंतु, ही सवलत फक्त त्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल जे नवीन कर व्यवस्था निवडतील.
जीएसटी नियमांमध्ये नवीन बदलांनुसार आयएसडी (इनपुट सर्व्हिस डिस्ट्रिब्युटर) प्रणाली लागू केली जाणार आहे. यामुळे, कंपन्यांना त्यांच्या इनपुट सर्व्हिस क्रेडिटचे योग्य वितरण करणे सोपे होईल.
बचत खाते आणि एफडीवरील व्याजदरात बदल होणार आहेत. एसबीआय, एचडीएफसी, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि आयडीबीआय बँक यांसारख्या प्रमुख बँकांमध्ये नवीन व्याजदर लागू होणार आहेत.
1 एप्रिल 2025 पासून, पॅन-आधार लिंक न केलेल्यांना स्टॉकवर लाभांश मिळणार नाही. पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले गेले आहे.
1 एप्रिलपासून तुमच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवली नाही, तर बँका तुम्हाला दंड आकारू शकतात.
सेबीने म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांसाठी सर्व गुंतवणूकदारांना केवायसी आणि नॉमिनी तपशील अपडेट करणे अनिवार्य आहे. तसे न केल्यास, डीमॅट खाते गोठवले जाऊ शकते.
1 एप्रिलपासून, एफडी, आरडी आणि इतर बचत योजनांवरील 1 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर टीडीएस कापला जाणार नाही.