Sainath Jadhav
डाळिंबाचा रस केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही अमूल्य आहे. दररोजच्या आहारात याचा समावेश केल्यास अनेक फायदे मिळू शकतात.
डाळिंबात प्युनिकॅलॅगिन्स आणि अँथोसायनिन्स हे मजबूत अँटीऑक्सिडंट्स असतात. हे शरीरातील पेशींचं नुकसान टाळायला मदत करतात आणि त्वचा तरुण व तजेलदार ठेवतात.
कोलेस्टेरॉल कमी करणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे आणि हृदय कार्य सुधारण्यास मदत करते. नियमित सेवनामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.
डाळिंबाचा रस मेंदूचं कार्य सुधारतो, स्मरणशक्ती वाढवतो आणि मेंदूला संरक्षण (न्यूरोप्रोटेक्शन) देतो.
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे सर्दी, ताप यांसारख्या सामान्य आजारांपासून संरक्षण मिळते.
त्वचेला नैसर्गिक उजळपणा आणि तरुणपणा मिळवण्यासाठी डाळिंबाचा रस खूप उपयुक्त आहे. यामुळे त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढते आणि त्वचा तगधीत राहते.
डाळिंबाचा रस पचन संस्थेचे आरोग्य सुधारतो. आतड्यांमधील जळजळ कमी करतो आणि चांगल्या बॅक्टेरियांसाठी पोषक ठरतो.
सकाळी उपाशीपोटी एक ग्लास डाळिंबाचा रस प्या, किंवा तो स्मूदीत मिसळा आणि सलाड ड्रेसिंगमध्ये वापरा.