Team Agrowon
अहमदनगर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींचे आवडीचे ठिकाण असलेल्या हरिश्चंद्रगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.
आजूबाजूच्या घनदाट जंगलामुळे नयनरम्य अनुभूती देणारा हरिश्चंद्रगड नजरेत सामावत नव्हता.
हरिश्चंद्र गडावर पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील सहा पर्यटक धुक्यामुळे रस्ता भरकटल्याने त्यापैकी एकाचा डोंगर कपारीत मृत्यू झाला..
जंगलातून जाणारी नागमोडी पायवाट, वाटेत खळखळणारे धबधबे, उंच कडे, अवघड अजस्र खिंडी, क्षणोक्षणी रोमांचित करतात.
वाटेत सोबत करणारे ओढे-नाले आमि सतत पडणाऱ्या पावसामुळे वाटा निसरड्या झालेल्या असतात.
निसर्गसौंदर्याने नटलेल्या गडावर खास करून पावसाळ्यात गडभ्रमंती करण्यात वेगळाच अनुभव येतो.
अंगावर येणारे दाट धुके, ढगांच्यावर डोके काढणारे डोंगर सुळके, घनदाट जंगल या सगळ्यांचा अनुभव घेतना मन अचंबित होत असते.