Sainath Jadhav
आल्याचा चहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि सर्दी-खोकल्यापासून आराम देतो. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत.
तुळशीचा चहा श्वसनसंस्थेच्या समस्यांवर उपाय करतो आणि तणाव कमी करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतो.
पुदीना चहा पचनक्रिया सुधारतो आणि पावसाळ्यातील गॅस, अपचन यासारख्या समस्यांवर प्रभावी आहे.
लवंग चहा अँटी-व्हायरल गुणधर्मांनी समृद्ध आहे, घशातील खवखव आणि संसर्गापासून संरक्षण करते.
हळदीचा चहा दाहक-विरोधी गुणधर्मांनी युक्त आहे, जो पावसाळ्यातील सांधेदुखी आणि संसर्गापासून बचाव करतो.
दालचिनी चहा रक्तातील साखर नियंत्रित करतो आणि पावसाळ्यातील थंडीपासून शरीराला उबदार ठेवतो.
हर्बल चहा रोज घ्या आणि पावसाळ्यात निरोगी राहा.