Team Agrowon
या रोबोटसाठी इंटिग्रेटेड मल्टी-चॅनेल सेन्सर तंत्रज्ञान विकसित केले आहे. या सेन्सर तंत्रज्ञानामुळे या रोबोटचे, कान, डोळे, डोक आणि तोंड मानवाप्रमाणे कार्यरत राहील,
रोबोटच्या कानात ७ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे, डोळ्यांत ५ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रोबोटच्या डोक्याच्या वरच्या बाजूला वाऱ्याचा वेग, कार्बन डायऑक्साईड, प्रकाशसंश्लेषण आणि रेडिएशन चा अंदाज येण्यासाठी सेन्सर बसवलेले आहेत.
हावामानाचा अंदाज येण्यासाठी तसेच वातावरणानूसार पिकाच्या व्यवस्थापनाची समज येण्यासाठी तोंडाखाली तापमान आणि आर्द्रता सेन्सर्स बसवले आहेत.
हा रोबोट हरितगृहातील फळे भाजीपाला पिकातील अचून व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे.
पिकाचे अवस्थेनूसार योग्य व्यवस्थापन कमी वेळात आणि अचूकपणे करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मजुरांवर होणारा खर्च वाचेल.
पिकाला पाण्याची किती व कोणत्या वेळी गरज आहे याविषयीही या रोबोटमुळे माहिती मिळू शकेल.