Anuradha Vipat
चाणक्य नीती आणि प्राचीन भारतीय विचारवंतांच्या मते, माणसाने आपल्या आयुष्यातील काही गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत.
जर या गोष्टी इतरांना समजल्या, तर प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि लोक तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.
तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा तुमची आर्थिक स्थिती कशी आहे, हे कधीही सर्वांसमोर उघड करू नका.
तुम्ही भविष्यात काय करणार आहात, कोणता नवीन व्यवसाय सुरू करणार आहात किंवा कोणती परीक्षा देणार आहात, हे काम पूर्ण होण्याआधी कोणालाही सांगू नका.
जेव्हा तुम्ही घरातील उणिवा बाहेर सांगता, तेव्हा बाहेरील लोक सहानुभूती दाखवण्याचे नाटक करतात आणि पाठीमागे तुमची मस्करी करतात किंवा त्या वादाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात.
तुम्हाला असलेला एखादा जुना आजार किंवा तुमची शारीरिक/मानसिक कमजोरी सर्वांना सांगत सुटू नका.
तुम्ही कोणाला मदत केली असेल, गुप्तदान केले असेल किंवा एखादे चांगले काम केले असेल, तर त्याचा गवगवा करू नका.