Energy Boosting Foods : ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान आहेत 'हे' पदार्थ; अशक्तपणा दूर होऊन स्नायू होतील मजबूत!

Anuradha Vipat

पोषक घटकांची कमतरता

वृद्धावस्थेत पचनशक्ती मंदावल्यामुळे आणि आहारात पोषक घटकांची कमतरता असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना वारंवार चक्कर येणे, थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

Energy Boosting Foods | Agrowon

ताकदवान पदार्थ

स्नायूंची झीज रोखण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांमधील अशक्तपणा दूर करणारे ताकदवान पदार्थ खालीलप्रमाणे आहेत.

Energy Boosting Foods | agrowon

नाचणी किंवा रागी

नाचणीमध्ये सर्व तृणधान्यांपेक्षा जास्त कॅल्शियम, लोह आणि फायबर असते. हे पचायला अत्यंत हलके असते आणि यामुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.

Energy Boosting Foods | agrowon

मखाना किंवा फॉक्स नट्स

मखाना हा अँटी-ऑक्सिडंट्स, प्रोटीन आणि पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. यामध्ये फॅटचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे हृदयविकार आणि मधुमेह असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीही हा एक उत्तम ऊर्जा देणारा पदार्थ आहे.

Energy Boosting Foods | Agrowon

खजूर आणि भिजवलेले बदाम

खजूरमध्ये नैसर्गिक शर्करा, आयर्न आणि मॅग्नेशियम भरपूर असते, जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करून थकवा लगेच घालवते. बदामामुळे मेंदूचे आरोग्य आणि स्नायू मजबूत होतात.

Energy Boosting Foods | Agrowon

मूग डाळीचे कढण किंवा सूप

मूग डाळ ही सर्वोच्च दर्जाचे शाकाहारी प्रोटीन मानली जाते, जी पचनसंस्थेवर अजिबात ताण पडू देत नाही. अशक्तपणामुळे गळलेले गात्र परत मिळवण्यासाठी हे सर्वोत्तम आहे.

Energy Boosting Foods | agrowon

गाईचे दूध आणि अश्वगंधा

दूध हे पूर्णान्न आहे. शाकाहारी लोकांसाठी दूध आणि मांसाहारी लोकांसाठी अंड्याचा पांढरा भाग हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. रात्री दुधासोबत अश्वगंधा घेतल्याने झोप चांगली येते आणि शरीराची ताकद वाढते.

Energy Boosting Foods | agrowon

Head Lice Remedies : डोक्यातील उवा आणि लिखा होतील मुळापासून साफ; ट्राय करा हे रामबाण घरगुती उपाय!

Head Lice Remedies | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...