Anuradha Vipat
डिलिव्हरीनंतर नवीन मातांच्या शरीरात प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.
या काळात शरीराला पुन्हा ऊर्जा मिळवून देण्यासाठी, कंबरदुखी दूर करण्यासाठी आणि स्तनपान वाढवण्यासाठी पोषणयुक्त आणि पारंपरिक घरगुती लाडू खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.
डिंक हा हाडे मजबूत करण्यासाठी उत्तम मानला जातो. डिलिव्हरीनंतर येणारी कंबरदुखी आणि सांधेदुखी दूर करण्यासाठी हे लाडू अत्यंत गुणकारी आहेत.
बाळंतपणात होणारी रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी हे लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय अळीवामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरातील थकवा कमी होतो.
मेथी दाणे स्तनपान वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. तसेच बाळंतपणानंतर गर्भाशय मूळ आकारात येण्यासाठी आणि शरीरातील अंतर्गत सूज कमी करण्यासाठी हे लाडू मदत करतात.
खजूर आणि ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात विटामिन्स, मिनरल्स आणि फायबर असतात. यामुळे पचनशक्ती सुधारते .
सुंठ आणि ओव्यामुळे नवीन मातेची पचनक्रिया मजबूत होते आणि पोटात गॅस होत नाही. आईचे पचन चांगले राहिल्यामुळे दुधावाटे बाळालाही गॅस किंवा पोटाच्या समस्या होत नाहीत.