Team Agrowon
कर्जतमधील करपडीमधील प्रगतशील शेतकरी देवा काळे यांनी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या मार्गदर्शनाखाली कांद्याचं एकरी तब्बल ३२ टन इतकं विक्रमी उत्पादन घेतलं आहे.
सध्या कांद्याला बाजार नसल्याने कांदा चाळीत भरून ठेवण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे.
या कामाची पाहणी आमदार रोहित पवार यांनी केली. शेतकरी देवा काळे यांच्याशी संवाद साधला.
कांदा नाशवंत माल आहे. त्यामुळे त्याची टिकवण क्षमता कमी आहे. कांदा साठवताना कशा प्रकारे काळजी घेतली जाते, याची माहिती आमदार पवार यांनी घेतली.जलसंधारणाजलसंधारणा
जलसंधारणाच्या कामाच्या माध्यमातून मतदारसंघ पाणीदार करण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी विविध गावांमध्ये ‘सीएसआर’ निधीतून अनेक कामं सुरु आहे.
तळवडीमध्येही ओढा खोलीकरणाचं काम सुरु असून या कामाची पाहणी करुन कामासंदर्भात रोहित पवार यांनी योग्य त्या सूचना दिल्या.