Team Agrowon
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता वितरीत केला.
२ लाख ६० हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले आहेत.
या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर २ हजार रुपये हस्तांतरित केल्याचा मेसेज आलेला असेल.
जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हप्त्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही काही काळ वाट पाहू शकता.
त्यानंतरही मेसेज आला नाही तर तुम्ही एटीएममध्ये जाऊन तुमचे मिनी स्टेटमेंट काढू शकता किंवा खात्यातील बॅलन्स तपासू शकता.
जर तुम्ही नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगची सुविधा वापरत असाल तर तुम्ही तुमच्या खात्यातील शिल्लक किंवा खाते स्टेटमेंट स्वतःही ऑनलाइन तपासू शकता.
योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर टोल फ्री क्रमांक : 18001155266 हेल्पलाईन : 155261, 18001155266, 011-24300606, 011-24300606 या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा