Cotton Market: आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात मोठी वाढ

Anil Jadhao 

कालपासून कापूस दरात सुधारणा दिसून आली. कापूस दर जवळपास दोन टक्क्यांची सुधारणा दिसली. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत कापसाचे वायदे ८१ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते.

Cotton | agrowon

देशात कापूस आकेचा दबाव कायम आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून देशातील शेतकरी कापूस मोठ्या प्रमाणात विकत आहेत. त्यामुळं कापसाचा एक मोठा लाॅट बाजारात आला. पुढील काही दिवसांमध्ये आणखी कापूस बाजारात येईल.

Cotton | agrowon

ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असेल ते जास्त काळ थांबतील. या थांबलेल्या शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाल्याशिवाय ते बाजारात कापूस आणणार नाही, याची कल्पना उद्योगांनाही आहे. त्यामुळं सध्याच्या दरात जास्तीत जास्त कापूस खेरदी करण्याचं किंवा बाजारात आणण्याचं उद्दीष्ट आहे.

Cotton | agrowon

एप्रिलमध्येही काही दिवस कापसाची आवक जास्त राहू शकते. मात्र त्यानंतर आवक मर्यादीत होऊन दरात सुधारणा होऊ लागेल, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार १०० रुपये दर मिळतोय.

Cotton | agrowon

बाजारातील आवक मर्यादीत झाल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दर पूर्वपातळीवर आल्यानंतर देशातील सरासरी दरपातळीही वाढू शकतात. पण त्यासाठी शक्य असल्यास शेतकऱ्यांनी थांबावं.

Cotton | agrowon

बाजारातील कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रत्यक्ष बाजाराचा आढावा घेऊनचं कापसाची विक्री करावी. कारण जसं शेतकऱ्यांना वाटतं जास्त दर मिळावा, तसं कापूस घेणाऱ्यांनाही वाटतं स्वस्तात कापूस मिळावा. बाजारात फंडामेंटल्स बदलले की परिस्थितीही बदलते हेही लक्षात ठेवावं.

Cotton | agrowon
soybean | agrowon