Milk Fat : दुधातील फॅट कमी का होते ?

Roshani Gole

आपल्याकडे सर्वसाधारणपणे गायीच्या दुधात ३.५ टक्के फॅट तर म्हशीच्या दुधात ५ टक्के फॅट प्रमाणित धरले जाते.

MIlk Production | Agrowon

जनावरांची आनुवंशिकता किंवा जात स्निग्धांशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.जर्सी गायीच्या दुधातील फॅटचे प्रमाण पाच टक्के, तर हॉलस्टीयन फ्रिजीयन गायीच्या दुधात ३ ते ३.५ टक्के फॅट आढळून येते.

MIlk Production | Agrowon

जनावरांना दिला जाणारा आहार संतुलित असणे गरजेचे आहे. जनावरांच्या आहारात ऊसाचा जास्त वापर केल्यास, जनावरांच्या आहारातील साखरेचे प्रमाण वाढून दुधातील फॅटचे प्रमाण कमी होते.

MIlk Production | Agrowon

सर्वसाधारणपणे आपल्याकडे दिवसातून दोन वेळेस धार काढली जाते. दूध काढण्याच्या या दोन्ही वेळेचा दूध उत्पादन व फॅटशी खूप जवळचा संबंध असतो.

MIlk Production | Agrowon

दूध काढताना सुरुवातीच्या धारांमध्ये स्निग्धांशाचे प्रमाण साधारणपणे एक टक्का, तर शेवटच्या धारांमध्ये हे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपर्यंत असते. त्यामुळे कासेतील पूर्ण दूध काढून घेण गरजेचं आहे.

MIlk Production | Agrowon
Bullcok Cart Race | Agrowon