Team Agrowon
जन्मानंतर वासरांना गरजेनुसार चीक व दूध न पाजल्यास वाढ खुंटते.
बहुतांशी पशुपालकांकडे निकृष्ट चारा उपलब्ध असतो आणि केवळ अशा चाऱ्यावर वासरांची पूर्ण क्षमतेने वाढ होत नाही. वासरांच्या जलद वाढीसाठी प्रथिनयुक्त आहाराची गरज असते.
वासरांच्या शरीरातील जंत रक्त पितात, वासराने पचवलेले अन्न खातात. आतड्यांना इजा करतात त्यामुळे पचवलेले अन्नसुद्धा वासरांच्या शरीरात नीट शोषले जात नाही, परिणामी वाढ खुंटते.
गोचिड, पिसवा, उवा वासराचे रक्त पिऊन वाढतात. वासरू नेहमी बेचैन राहते. त्यामुळे चारा खाण्यावरील लक्ष कमी होऊन त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते.
गोठ्यातील इतर गाई/ म्हशी लहान वासरांना चारा, खाद्य खाऊ देत नाहीत त्यामुळे त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते.
वासरांना एकेठिकाणी दोरीने बांधल्यामुळे वासरांच्या शरीरावर एक प्रकारचा सतत ताण येतो. शरीराचा व्यायाम न झाल्यामुळे पचनक्षमता कमी होऊन वाढ खुंटते.
गोठा, सभोवतालची दलदल, अस्वच्छ वातावरण यामुळे वासराला नेहमी श्वसनाचे आजार होतात, हगवण लागते. त्यामुळे वासरांची वाढ खुंटते.