Animal Diseases : उन्हाळ्यात जनावरांना कोणते आजार होतात?

Team Agrowon

अति उष्णतेमुळे माणसांप्रमाणेच जनावरांच्या नाकातून सुद्धा उन्हाळ्यात रक्तस्त्राव होतो.हा रक्तस्त्राव संकरित जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो.यावर उपाय म्हणून जनावराच्या डोक्यावर थंड पाणी ओतावं. 

Animal Diseases | Agrowon

जनावरांना भरपूर थंड पाणी आणि हिरवा चारा द्यावा.जनावरे झाडाखाली किंवा गोठ्यामध्ये सावलीत राहतील याची काळजी घ्यावी. रक्तस्त्राव थांबत नसेल तर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांना जीवनसत्व क आहारातून किंवा औषधातून द्यावं. 

Animal Diseases | Agrowon

जास्त  उन्हामुळे जनावरांच्या कातडीला कडव्या आजार होतो.ज्या जनावरांच्या कातडीचा रंग पांढरा असतो त्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्त दिसतो.कारण पांढरा रंग असणाऱ्या जनावरांच्या कातडीत मेलेनीन नावाचा घटक कमी प्रमाणात असतो

Animal Diseases | Agrowon

चाऱ्याच्या कमतरतेमुळे भुकेपोटी जनावर गाजर गवत खातात आणि अशी जनावरे सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहिली असता जनावरांना कडव्या  हा आजार होतो.

Animal Diseases | Agrowon

गाजर गवतातील विषारी घटक व सूर्यप्रकाशाचा परिणाम कातडीवर दिसून येतो.यावर उपाय म्हणून जनावरांना सावलीत बांधावीत. 

Animal Diseases | Agrowon

जनावरे गाजर गवत खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्याना भरपूर प्रमाणात थंड पाणी द्यावं.पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनाखाली उपचार घ्यावेत.

Animal Diseases | Agrowon
Jinger Processing | Agrowon