sandeep Shirguppe
आपल्या शरिरात उष्णता जास्त असेल तर शरीराला थंडावा देण्यासाठी विविध गोष्टी खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देत असतात.
दरम्यान आपल्या शरिराला थंडावा मिळण्यासाठी सर्वात चांगला फायदा गुलकंदचा होतो. थंडाव्यासोबत डायजेशन सिस्टीम चांगली होण्यासाठी गुलकंदचा वापर केला जातो.
गुलकंद थकवा, वेदना, स्नायूचे दुखणे, पोटातील उष्णता यासारख्या आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
रोज एक चमचा गुलकंद खाल्ल्यास थंडावा मिळतो. गुलकंद नुसते खाण्यासोबतच तुम्ही ते सरबत किंवा लस्सी मध्ये देखील टाकून घेऊ शकता.
गुलकंद तोंडातील अल्सरवर उपचार म्हणून वापरले जाते. शरीरातील जास्त उष्णतेमुळे तोंडात अल्सरचा त्रास होतो. यात भरपूर प्रमाणात लोह असते.
महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान ओटी पोटात दुखणे किंवा हेवी फ्लो असेल तर त्यापासून आराम देण्यासाठी गुलकंद खाल्ल्यास त्रास कमी होतो.
ज्या लोकांना पाइल्सचा त्रास असेल, त्यांच्यासाठी देखील गुलकंद उपयुक्त आहे. यात भरपूर प्रमाणात अॅन्टी ऑक्सिडेंट असतात, जे शरीराला डिटॉक्स करण्यासाठी मदत होते.
ज्या लोकांच्या नाकातून अचानक रक्त येते अशा लोकांनी गुलकंद खाल्ले पाहिजे. गुलकंदच्या थंडाव्याचा शरीरातील घामावर देखील परिणाम होतो.
साखरेचा पाक आणि गुलाबपाकळय़ांनी तयार केलेला गुलकंद नियमित खाण्याचे विविध फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत.
गुलकंद खात असताना एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन खा.