Rain Agrowon
हवामान

Maharashtra Rain : कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

अमोल कुटे

Pune News : मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दणका दिला आहे. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. उद्यापासून (ता. २८) राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी (ता. २३) परतीचा प्रवास सुरू केला. मंगळवारी (ता. २४) राजस्थान आणि गुजरातच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियानाच्या काही भागांतून मॉन्सून परतला आहे. फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माउंट आबू, दिसा, सुरेंद्रनगर ते जूनागडपर्यंत मॉन्सूनची परतीची सीमा गुरुवारी (ता. २६) कायम होती. उत्तर महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून उत्तर बांगलादेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे राज्यातील उन्हाचा चटका कमी झाला आहे. गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उकाडा कायम असून, दुपारनंतर जोरदार वादळी वारे, विजांसह वळीव स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढत आहे.

आज (ता. २७) कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उद्यापासून (ता. २८) राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.

अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) : पालघर, नाशिक, नंदूरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : जलसंवर्धन, ग्रामविकासात ‘जीआयएस’ महत्त्वाचे...

Flaws in Democracy : लोकशाहीतील दोष दूर करण्यासाठी...

Fertilizers Use : पर्यायी खतांचा करा परिणामकारक वापर

Voluntary Retirement : ‘महानंद’च्या ४६७ कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्ती

Sugar Factory Repayment : साखर कारखान्यांवरील थकहमी परतफेडीसाठी लागणार साधे बंधपत्र

SCROLL FOR NEXT