Rain Update  Agrowon
हवामान

Rain Alert : घाटमाथ्यावर जोरदार पाऊस

Team Agrowon

Pune News : राज्यातील पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. तरीही काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. तर घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक होता. शनिवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंत लोणावळा घाटमाथ्यावर सर्वाधिक १८० मिलिमीटर पाऊस झाला. जोरदार पावसामुळे ओढे, नाले भरून वाहत आहेत. तर मध्य महाराष्ट्रातील धरणांत अजूनही आवक सुरू असल्याने विसर्ग सुरू आहे.

गेल्या आठ दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडत आहे. परंतु मागील दोन दिवसांपासून कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे. कोकणातील रायगड, पालघर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. तर ठाणे जिल्ह्यातील भाईंदर, ठाणे शहर, मुंब्रा येथे ४८ मिलिमीटर पाऊस पडला. तर अनेक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. तर रायगडमधील चौक येथे ११० मिलिमीटर पाऊस झाला. तर सरल येथे ९३ मिलिमीटर पाऊस पडला. पालघरमधील साईवन, तलवड येथे १०५ मिलिमीटर पाऊस झाला असून, मोखडा ८१, कसा ७७, कांचगड, विक्रमगड ७२ मिलिमीटर पाऊस पडला.

घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. सहा घाटमाथ्यावर १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. तर सहा घाटमाथ्यावर ८० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. तर नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. यामध्ये नाशिकमधील दहादेवाडी ८१ मिलिमीटर, उंबरठाणा ३९, इगतपुरी ५३, धारगाव ४६, हर्सूल, देवळा ४८ मिलिमीटर, पुण्यातील लोणावळा येथे १०६ मिलिमीटर, तर वेल्हा १२६, मुठे ५५, कार्ला ९२ मिलिमीटर, साताऱ्यातील महाबळेश्‍वर ५०, लामज ४० मिलिमीटर, नंदूरबारमधील आष्टे ६६, नवापूर ८१, नवागाव ६८, चिंचपाडा ४८, खापर ७५, मोरांबा ६५, वडफळी ४१ मिलिमीटर, जळगावमधील पिंप्राळा, जामनेर ४८, नसिराबाद ४१ मिलिमीटर पाऊस झाला. मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे. छत्रपत्री संभाजीनगरमधील चिखलठाणा, चिचोली लिबाजी, करंजखेड, सोयगाव, बनोटी, बाबारन, जालन्यातील अंबड, धनगरपिंप्री येथे सरी बरसल्या.

कोकणातील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस

खानदेशात नंदुरबार मध्यम सरी, उर्वरित भागात तुरळक पाऊस

मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी

मराठवाड्यात तुरळक सरी

विदर्भात हलका सरी

लोणावळा घाटमाथ्यावर सर्वाधिक १८० मिलिमीटर पाऊस

या घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस झाला

लोणावळा १८०, वळवण १५१, ताम्हिणी १४०, दावडी ११२, खोपोली १२८, शिरोटा १०४, शिरगाव ९८, आंबोणे ९४, कुंडली ८९, खांड ८४, डुंगरवाडी ८२, कोयना ८०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : सततच्या पावसाने भाजीपाला पिकांना फटका

PM Modi : प्लॅनिंग आणि व्हिजनचा अभावामुळेच पुण्यासह देशाचा विकास थांबला, पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका

Ginger Research : आले संशोधन केंद्राच्या हालचाली सुरू

Digital Agriculture Campaign : केंद्राच्या डिजिटल कृषि मिशनला एसकेएमच्या नेत्यांकडून विरोध

Jayakawadi Dam : जायकवाडीतील विसर्गात घट-वाढ सुरूच

SCROLL FOR NEXT