Carrot price agrowon
Video

Soybean Market Price: जाणून घ्या; आजचे तीळ, गाजर, पपई, काकडी आणि सोयाबीनचे बाजारभाव

आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण तीळ, गाजर, पपई, काकडी आणि सोयाबीन बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

बाजारातील वाढत्या आवकेबरबोर तिळाच्या भावातही नरमाई दिसून आली. बाजारात सध्या तिळाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ते १२ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे दर मिळत आहेत. गाजराला बाजारात चांगला उठाव आहे. तसेच गाजराची आवकही चांगली सुरु आहे. सध्या गाजराला प्रतिक्विंटल सरासरी १२०० ते १५०० रुपयांचा भाव मिळत आहे. राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे. पपईचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांनी कमी झाले आहेत. पपईला सध्या १२०० ते १६०० रुपयांचा भाव मिळत आहे. सध्या उन्हाचा चटका वाढल्याने काकडीला चांगली मागणी आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागात काकडीला सध्या १ हजार १०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. बाजारातील सोयाबीनची आवक खूपच कमी झाली. सध्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ४ हजार १०० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सचे खरेदीचे भाव ४ हजार ४५० ते ४ हजार ५५० रुपयांच्या दरम्यान आहेत. नाफेडची विक्री ४ हजार ३०० ते ४ हजार ३५० रुपयाने होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरमार्गे होण्यासाठी आंदोलनाचा निर्णय

Fertilizer Management: माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे

Sugarcane Farmer Issue: उसाला तुरे आल्याने शेतकरी चिंतेत

Agriculture Storage Subsidy: कांदाचाळ, लसूण साठवणूक गृहासाठी शासन देणार अनुदान

Rabi Season: चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी क्षेत्र पोहोचले ५३ हजार हेक्टरवर

SCROLL FOR NEXT