India Pakistan trade agrowon
Video

India Pakistan War : आखाती आणि सोवियत संघातील देशांना निर्यातीचा खर्च वाढणार

भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाचा परिणाम शेतीमालावरही होत आहे. पाकिस्तानमार्गे आफगाणिस्तान तसेच आखाती आणि सोवियत संघातील देशांमध्ये होणारी शेतीमालाची निर्यात सध्या ठप्प झाली आहे. आता सोयापेंडसह तेलबिया पेंड, कांदा आणि हळदीसह मसाले पदार्थ, तेलबिया, सुकामेव्याची निर्यात लांब पल्ल्याच्या मार्गाने करावी लागणार आहे. त्यामुळे निर्यातीचा खर्चही वाढणार आहे, असे निर्यादारांनी सांगितले.

Team Agrowon

भारताच्या शेतीमालाची निर्यात आखाती देशांना मोठ्या प्रमाणात होत असते. ही निर्यात करण्यासाठी भारताला पाकिस्तानमार्गे सोपे जाते. भारतातून माल पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवला जातो. अफगाणिस्तामधून त्यानंतर शेतीमाल एका मार्गाने आखाती देशांना जातो. यात इरान, सौदी अरब संयुक्त अरब अमिराती, कुवैत, बहरीन आणि जाॅर्डन या देशांचा समावेश आहे. तर दुसऱ्या मार्गाने सोवियत संघातील देशांना जातो. पाकिस्तानातून या देशांना निर्यात करणे सोपे जाते. शिवाय कालावधी कमी लागतो आणि खर्चही कमी येतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाची स्थिती आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापारी मार्ग बंद केला. वाघा-अटारी सिमा यापुर्वीच बंद झाली आहे. दोन्ही देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती असल्याने शेतीमाल वाहतूक शक्य नाही. त्यामुळे भारतातून शेतीमाल निर्यातीचा सोपा मार्ग बंद झाला. त्यामुळे भारताला आता पाकिस्तानला वगळून लांब पल्ल्याच्या मार्गाने शेतीमाल या देशांना पोचवावा लागणार आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review: एआय देईल ऊस शेतीला नवी दिशा

Mango Crop Pest: आंब्यावरील ‘लीफ मायनर’

Weekly Weather: थंडीत वाढ होण्याची शक्यता

Land Reform: बाराशे गावांतील ६० हजार गट नंबर होणार ‘डीम्ड एनए’

Agrowon FPC Conclave: सखोल अभ्यास, दीर्घकाळ चिकाटीच देईल यश

SCROLL FOR NEXT