प्रौढांपेक्षा अळ्यांच्या वेगळ्या खाद्याने वाढतेय किडींची हानीकारकता 
प्रौढांपेक्षा अळ्यांच्या वेगळ्या खाद्याने वाढतेय किडींची हानीकारकता  
मुख्य बातम्या

प्रौढांपेक्षा अळ्यांच्या वेगळ्या खाद्याने वाढतेय किडींची हानीकारकता 

वृत्तसेवा

गेल्या काही वर्षांमध्ये हानीकारक ठरणाऱ्या किडी कृषी आणि वन्यझाडांसाठी आणखी हानीकारक ठरण्याची शक्यता पेन स्टेट येथील संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पॉटेड लॅटर्नफ्लाय, स्टिंक बग आणि इमराल्ट अॅश बोरर या किडींची अभ्यास केला असून, एशियन लॉंगहॉर्नड बीटल या किडीचा अभ्यास सुरू केला आहे. या एशियन लॉंग हॉर्नड भुंगेऱ्याचे प्रौढ आणि अळ्या यांचा आहार समान नाही. या अळ्या आपल्या पालकांपेक्षाही वेगळ्या प्रजातींचा फडशा पाडू शकतात.  एशियन लॉंगहॉर्नड बीटल्स यांनी अमेरिकेतील अनेक प्रांतामध्ये चांगलेच बस्तान बसवलेले आहेत. इल्लिनॉईस, न्युजर्सी, न्यू यॉर्क आणि मॅसेच्युसेट्स येथील जंगलातील या किडीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी अमेरिकन कृषी विभागाच्या पशू आणि वनस्पती आरोग्य निरीक्षण सेवा विभागाने सुमारे ६४० दशलक्ष डॉलर इतका खर्च केला आहे. हा कार्यक्रम न्यू यॉर्क, मॅसेच्यूसेट्स आणि ओहियो येथे राबवण्यात आला.  चीन येथील स्थानिक लाकूड पोखरणारी अळीच्या अभ्यासामध्ये पेन स्टेट युनिव्हर्सिटी येथील संशोधकांना अनेक नव्या बाबी उलगडल्या आहेत. या अळ्या आपल्या पालकांपेक्षा अधिक झाडांवर आपला मोर्चा वळवत आहेत. पूर्वी ज्या झाडांच्या प्रजातींमुळे या अळ्या आजारी पडत होत्या, त्या अलीकडे त्यांच्या प्राधान्याची यजमान झाडे झाली आहेत. उदा. मॅपल, इल्म आणि विलो या झाडांवर पूर्वी ही कीड आढळत नव्हती. मात्र अलीकडे त्यांनी पोखरलेली अनेक झाडे दिसून येत आहेत.  एशियन लॉंगहॉर्नड बीटल ही कीड १९९० च्या सुरवातीच्या काळामध्ये लाकडी पॅकेजिंगसोबत आल्याचा अंदाज कीटकशास्त्राच्या प्रो. केली वुव्हर यांनी व्यक्त केला आहे. या किडीवर त्या आपल्या गटासह गेल्या १९ वर्षांपासून संशोधन करत आहेत. त्या म्हणाल्या की, उत्तम अमेरिकेमध्ये एशियन लॉंगहॉर्नड भुंगेऱ्यांनी १५ वनस्पती कुळापैकी डझनभर जाती नष्ट केल्या आहेत. उत्तरेतील काठिन्य वृक्षाची जंगले अॅटलांटीक समुद्रापासून ग्रेट लेक आणि त्यापुढेही अंदाजे ४८ दशलक्ष एकर क्षेत्रामध्ये पसरलेली आहेत. यात अनेक संवेदनशील जाती असून, त्या नष्ट होण्याचा धोका आहे. अर्थात, ही काही नवी कीड नाही. मात्र, तरीही अर्थव्यवस्थेचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान होत आहे. वुव्हर यांनी सांगितले, की अमेरिकेच्या कृषी विभागाने एशियन लॉंगहॉर्न भुंगेऱ्यांच्या नियंत्रणासाठी मोहीम राबवली नसती तरी कदाचित हे नुकसान आणखी मोठ्या क्षेत्रामध्ये पसरले असते. त्यामुळे हा कार्यक्रम राबवत राहण्याची आवश्यकता आहे.  संशोधनातील महत्त्वाचे... 

  • कीटकशास्त्राचे पोस्टडॉक्टरल संशोधक चार्ली मॅसोन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉपलरसारखी काही झाडांमध्ये एशियन लॉंगहॉर्नड भुंगेऱ्यांप्रति अत्यल्प प्रतिकारकता आहे. प्रतिकारकतेविषयीच्या चाचणीमध्ये चिनी पॉपलर आणि स्थानिक पॉपलर यातील फरक तपासण्यात आला. ही झाडे प्राधान्याने त्याची साल आणि अंतर्गत स्नायूमध्ये काही संयुगे तयार होतात. ती लाकूड पोखरणाऱ्या किडींद्वारे टाळली जातात. मात्र, नुकत्याच झालेल्या अभ्यासामध्ये एशियन लॉंगहॉर्नड भुंगेऱ्याच्या अळ्या प्रौढापेक्षा चांगल्या रितीने या झाडांचे स्नायू पचवू शकतात. 
  • काही वेगळ्या वनस्पती जातींचा प्रौढ किडींवर तीव्र प्रभाव पडतो. मात्र, हाच परिणाम त्यांच्या सुरवातीच्या अवस्थांमध्ये दिसून येत नाही. संशोधकांच्या पाहणीमध्ये प्रौढ मादी भुंगेरा लाल मॅपल झाडांचे हिस्से खाऊन जगत असतानाही अंड्यांची निर्मिती करण्याची क्षमता राखून आहे. मात्र, अन्य पूर्वेतील कॉटनवूड (त्यालाच नेकलेस पॉपपर किंवा चिनी व्हाईट पॉपलर या नावाने ओळखले जाते.) 
  • कारण पॉपर झाडांच्या सालीमध्ये सॅलिसिनॉईड फिनॉलिक तीव्र संयुगे असून, त्यामुळे प्रौढ भुंगेरे त्यापासून दूर राहतात. मात्र, त्याच झाडाच्या लाकडांमध्ये या संयुगांचे प्रमाण कमी असल्याचे मॅसान यांनी सांगितले. 
  • आवडत नसले तरी प्रौढ मादी भुंगेऱ्याद्वारे सालीमध्ये खाचा करून त्यात अंडी घातली जातात. तिथे अंडी उबल्यानंतर बाहेर पडलेली अळी साली खाण्यापेक्षा झाडाच्या लाकडांमध्ये पोखरत, खात आतपर्यंत जाते. अळ्या सालीतील विषारी संयुगेपासून दूर राहत आतील लाकडांचा फडशा पाडतात. यामुळे झाड कमकुवत, अस्थिर बनते. ते साध्या वाऱ्यापावसात कधीही कोसळू शकते. अशी कोसळलेली अनेक झाडे न्यू यॉर्क, वर्सेस्टर, मॅस्सेच्यूसेट्स आणि शिकागो येथे दिसून येतात. थोडक्यात, प्रौढ आणि त्यांच्या अळीच्या यजमान आणि खाद्यसवयी समान नसल्याचे या संशोधनातून पुढे आले आहे. 
  • हे संशोधन ‘जर्नल ऑफ ॲनिमल इकॉलॉजी’ मध्ये नुकतेच प्रकाशित केले आहे. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

    Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

    Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

    Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

    Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

    SCROLL FOR NEXT