Soybean Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Soybean Market : बारदान्याचा तुटावड्या अभावी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. त्या अडचणी आता दूर केल्या आहेत. खरेदीलाही मोठी गती आली आहे.

Team Agrowon

Dharashiv News : बारदान्याचा तुटावड्या अभावी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब झाला. त्या अडचणी आता दूर केल्या आहेत. खरेदीलाही मोठी गती आली आहे. आजवर १२ हजार ७५८ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे. तर निकषात बसणाऱ्या ६ हजार ३२८ क्विंटल सोयाबीन चार हजार ८९२ रुपये हमीभावाप्रमाणे तीन कोटी नऊ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत.

उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर चार दिवसांच्या आत रक्कम जमा केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप हमीभाव खरेदी केंद्राकडे नोंदणी केली नाही त्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना केले आहे. जिल्ह्यातील १७ हमीभाव खरेदी केंद्रांवरून सोयाबीन खरेदी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या काळात बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब निर्माण झाला होता.

फेडरेशनकडे पाठपुरावा करून बारदाना निविदा प्रक्रिया आपण तातडीने राबवून जिल्ह्यासाठी आवश्यक असलेला बारदाना उपलब्ध करून घेतला. त्यामुळे आता हमीभाव केंद्रांवर खरेदी प्रक्रियेला मोठी गती आहे. परिणामी, खुल्या बाजारातही सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी खुल्या बाजारात सोयाबीन विकण्याची घाई न करता नोंदणीसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत दिलेल्या मुदतवाढीचा उपयोग करून घ्यावा.

ज्या शेतकऱ्यांनी फेडरेशनकडे नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने नोंदणी करून सोयाबीन खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील भूम, दस्तापूर, गुंजोटी, ईट, नळदुर्ग, कळंब, वाशी, उमरगा, धाराशिव, सोन्नेवाडी, चिखली, शिराढोण, टाकळी बें, तुळजापूर, कानेगाव, कनगरा, चोराखळी आदी १७ ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. आतापर्यंत १२ हजार ७५८ क्विंटल सोयाबीनची खरेदी पूर्ण झाली आहे.

६ हजार ३२८ क्विंटल सोयाबीनचे रु-तीन कोटी नऊ पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. यापूर्वी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी १५ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिल्यामुळे हमीभाव खरेदी केंद्राच्या प्रक्रियेला मुदत वाढ मिळावी अशी मागणी आपण केली होती.

त्यानंतर त्यात वाढ करून आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे जे शेतकरी नोंदणीपासून वंचित राहिले आहेत त्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा. जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करण्याची घाई न करता लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.

चार दिवसांत सोयाबीनचे पैसे खात्यात

यापूर्वी सोयाबीन विक्रीचे पैसे मिळावे याकरिता चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता चार दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीनचे पैसे जमा होत आहेत. आजवर सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रु. तीन कोटी नऊ जमा करण्यात आले आहेत. खरेदी केंद्रावर १२ टक्के आर्द्रतेचा निकष आहे. वाहतूक खर्चाचे नुकसान टाळण्यासाठी सोयाबीन हमीभाव केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नेण्यापूर्वी आर्द्रतेचा तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT