Agriculture Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Agrowon Podcast : कांद्यात काहिशी नरमाई; कापूस, सोयाबीन, गहू तसेच काय आहेत हरभरा दर?

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीनमध्ये चढ उतार

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कालच्या तुलनेत आज चढ उतार दिसून आले. आज दुपारपर्यंत वायदे १०.४५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंडचे वायदे ३३० डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कायम होता. सोयाबीनचा भाव सध्या ४ हजार ६०० ते ४ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपला भाव ४ हजार ८०० ते ४ हजार ९५० रुपयांच्या दरम्यान काढला होता. सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापूस स्थिरावला

कापसाच्या भावातील चढ उतार कायम आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव आज दुपारपर्यंत कालच्या तुलनेत काहीसे कमीच होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ७३.४६ सेंट प्रतिपाऊंडवर बंद झाले होते. तर देशातील वायदे आज कमी होऊन ५७ हजार ९०० रुपये प्रतिखंडीवर होते. जागतिक बाजारात सध्या कापसाच्या भावावरील दबाव कायम दिसतो. तर देशातील कापूस पुढील महिनाभरात बाजारात दाखल होईल. त्यामुळे कापसाच्या भावातील चढ उतार कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

कांद्यात चढ उतार

कांदा दरातील चढ उतार कायम आहे. कांद्याच्या भावात रोज ५० ते १०० रुपयांची तेजी मंदी दिसून येत आहे. सरकारने स्टाॅकमधला कांदा विक्री सुरु केली. तसेच पंजाबमध्ये अफगाणिस्तानमधून कांदा दाखल होत आहे. याचा परिणाम बाजारात कांद्याच्या भावावर दिसून येत आहे. कांद्याचा भाव बाजारात आज ४ हजार २०० ते ४ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कांद्याच्या भावातील चढ उातर कायम राहू शकतात, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

हरभऱ्यातील तेजी कायम

हरभऱ्याच्या भावातील तेजी कायम आहे. देशातील अनेक बाजारात हरभऱ्याचा भाव वाढला आहे. सणांमुळे हरभऱ्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण स्टाॅकिस्ट त्या प्रमाणात बाजारात हरभरा आणत नाहीत. परिणामी हरभऱ्याच्या भावात सुधारणा झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याला सध्या ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पण दुसरीकडे वाढलेल्या भावात मागणी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच आयात मालही येत आहे. त्यामुळे हरभऱ्याच्या भावात चढ उतार राहतील, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

गव्हाच्या भावाला आधार

गव्हाला सणांमुळे मागणी वाढली आहे. सणांची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी गव्हाची खरेदी करत आहेत. पण सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत गव्हाचा पुरवठा कमी दिसतो. त्यातच सरकारची गहू विक्रीही कमी झाली आहे. यामुळे गव्हाचे भाव गेल्या आठवडाभरात काहीसे वाढलेले दिसत आहेत. गव्हाचा भाव मागील काही दिवसांपासून १०० ते १५० रुपयांनी वाढला आहे. सध्या गव्हाचा प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ६०० ते ३ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहेत. बाजारातील गव्हाची मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गव्हाच्या भावातील सुधारणा कायम राहील, असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Productivity : डाळिंब केंद्राच्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करत उत्पादकता वाढवावी

Grapefruit : मुरूडला पपनसाच्या उत्‍पादनात घट

Farmers Issue : सरकारकडून शेतकऱ्यांच्या मानसिक खच्चीकरणाचे काम

Crop Damage : पाऊस थांबेना, डोळ्यांदेखत सोयाबीन पाण्यात

Agriculture Mortgage Scheme : लासलगाव बाजार समितीत शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू

SCROLL FOR NEXT