Urad Market  Agrowon
मार्केट बुलेटीन

Urad Market : उडदाचे उत्पादन घटले; मागणी चांगली

दक्षिण भारतातील सणांमुळं उडदाला उठाव मिळतोय. शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याच्या काळात उद्योग आणि स्टाॅकिस्ट यांनी उडदाची चांगली खरेदी केली. आयात उडदालाही उठाव होता.

Anil Jadhao 

१) आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत

अर्जेंटीनातील दुष्काळी स्थितीचा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजाराला (Soybean Market) फायदा होताना दिसत आहे. सोयाबीनचे दर (Soybean Rate) आज वाढले होते. आज दुपारी १ वाजेपर्यंत सोयाबीनचे वायदे १५.३४ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते.

तर सोयापेंड (Soya Meal) ४८७ डाॅलर प्रतिटनांपर्यंत पोचले होते. पण देशातील बाजारात सोयाबीचा भाव (India Soybean Market Rate) दबावातच आहे.

आजही सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये भाव मिळाला. पण देशातील सोयाबीनचे भाव (Soybean Bhav) पुढील काही दिवसांमध्ये सुधारण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

२) देशातील कापूस बाजार सुस्तच

देशातील बाजारात कापसाचे भाव (Cotton Rate) आजही दबावात होते. आज देशात कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ते ८ हजार ५०० रुपये दर मिळाला. तर बाजारातील कापूस आवकही कमी झालेली दिसते.

मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात मोठे चढ उतार सुरु आहेत. आज १ वाजेपर्यंत कापसाचे वायदे ८५.६७ सेंटवर होते.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी वाढत आहे. त्यामुळं देशातही कापसाचे भाव सुधारतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

३) लाल मिरचीला दराच तडका

देशात यंदा लाल मिरचीचे उत्पादन घटले. पाऊस आणि कीड रोगांचा मिरची पिकावर परिणाम झाला. त्यामुळं मिरची उत्पादन कमी होऊन बाजारातील आवकही घटली.

परिणामी लाल मिरचीचे दर सध्या तेजीत आहेत. वाळलेल्या लाल मिरचीला सध्या प्रतिक्विंटल १५ हजार ते २५ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. सध्याची स्थिती पाहता लाल मिरचीचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

४) वांग्याची आवक घटली

राज्यातील बाजारात सध्या वांग्याची आवक घटली आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक बाजार समित्या वगळता इतर ठिकाणची आवक सरासरी २० क्विंटलपेक्षा कमीच आहे.

मात्र वांग्याला उठाव मिळतोय. त्यामुळं सध्या वांग्याला सरासरी १ हजार ३०० ते २ हजार १०० रुपयांचा दर मिळतोय.

पण बाजारातील आवक बघता सध्याचा दर कमीच असल्याचं शेतकरी सांगतात. तर वांग्याचे दर पुढील काळात वाढू शकतात, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

५) उडदाची आयात यंदा वाढेल का?

देशातील बाजारात सध्या उडदाचे भाव टिकून आहेत. यंदा सरकारने उडदासाठी ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. पण देशात उडदाचे उत्पादन कमी झालं. त्यामुळं सध्या उडदाला सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ३०० रुपये दर मिळत आहेत.

बाजारात आता खरिपातील उडदाची आवक कमी झाली. अनेक बाजारांमध्ये आवक नगण्य पातळीवर पोचली. मात्र दुसरीकडं मागणी टिकून आहे. त्यामुळं दरही कायम आहेत.

दक्षिण भारतातील सणांमुळं उडदाला उठाव मिळतोय. शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याच्या काळात उद्योग आणि स्टाॅकिस्ट यांनी उडदाची चांगली खरेदी केली. आयात उडदालाही उठाव होता.

त्यामुळं बंदरांवरील गोदामांमधील उडदाचा साठा घटला. आता भीस्त आहे ती तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील उत्पादन आणि म्यानमारमधून होणाऱ्या आयातीवर.

दक्षिण भारतात यंदा ४ लाख टनांच्या दरम्यान उडिद उत्पादनाचा अंदाज आहे. तर म्यानमारमधील उत्पादन ६ लाख ५० हजार टन राहू शकतं. त्यापैकी किती उडिद देशात येऊ शकते, हे पाहणं गरजेचं आहे. \

पण देशात पुढील काळात उडादाला चांगली मागणी राहणार आहे. त्यामुळं उडदाचे भाव ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान राहतील, असा अंदाज उडिद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT