Market Update  Agrowon
मार्केट बुलेटीन

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

Agriculture Commodity Market : आज आपण सोयाबीन, कापूस, मका, गहू आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत.

Anil Jadhao 

Market Bulletin :

सोयाबीन दबावातच

देशातील बाजारात सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. तर प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान काढले होते.

तर एनसीडीईएक्सच्या खरेदी केंद्रावर आज ४ हजार ३९० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. तर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीनमधील चढ उतार कायम आहेत. ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली.

कापसात नरमाई

देशातील बाजारात कापसावरील दबाव कायम आहे. कापसाला आजही देशातील बाजारात ६ हजार ७०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला. तर वायद्यांमध्ये भाव काहिसे कमी होऊन ५५ हजार ९०० रुपये प्रतिखंडीवर आले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदेही कमी होऊन ७०.७७ सेंट प्रतिपाऊंडवर होते. बाजारातील कापसाची आवक पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस बाजारातील चढ उतार कायम राहण्याचा अंदाज आहे.

कांदा भाव स्थिर

कांद्याच्या सरासरी भावात नरमाई कायम आहे. कांद्याच्या भावात चढ उतार मागील १५ दिवसांपासून वाढले. देशातील बाजारात कांद्याची आवक कमी आहे. पण सरकार मोठ्या बाजारांमध्ये कांदा भाव कमी करण्यासाठी विक्री करत आहे.

त्याचा परिणाम कांदा भावावर दिसून येऊ असल्याचे व्यापारी सांगत आहेत. कांद्याला सरासरी सध्या ४ हजार ते ५ हजारांचा भाव मिळत आहे. कांद्याच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

गव्हाचे भाव तेजीतच

देशातील बाजारात गव्हाचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. गव्हाला सध्या सणांची मागणी आहे. गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते. तसेच सरकारडे गव्हाचा स्टाॅक कमी आहे.

बाजारातील गव्हाची आवकही कमी आहे. त्यामुळे गव्हाचे भाव स्थिर आहेत. सध्या गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ५०० ते ३ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. ऐन रब्बी पेरणीच्या काळात गव्हाचे भाव चांगले असल्याने पेरा वाढू शकतो, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

केळीचे दर टिकून

राज्यात केळी दरात सतत चढउतार होत आहेत. बाजारातील केळीची आवक कमीच आहे. तसेच पुढील काळातील आवकही कमीच राहण्याचा अंदाज आहे. राज्यात केळीला सध्या १२०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा तर मिळत आहे. पुढे सणासुदीचा कालावधी आहे. यामुळे केळी दरात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

केळी आवकेत पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे. नवती बागांमधून केळीची आवक डिसेंबर, जानेवारीत सुरू होईल. तर पिलबाग केळीमधील आवकही डिसेंबरमध्ये सुरू होईल. यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे. त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT