livestock Agrowon
Image Story

Livestock : बाजरात शेळ्या-मेंढ्यांची आवक वाढली

यंदा बकरी ईद (Bakari-Eid) सणानिमित्त बाजार भरला आहे. शेळ्या-मेंढ्याचे (Livestock) आवक कमी राहिल्याने बाजारात (Market) तेजी पाहायला मिळाली. बुधवारी (ता. ६) ८७ लाख ८० हजार रुपयांची उलाढाल बाजारात झाली.

Team Agrowon

सांगली: यंदा बकरी ईद (Bakari-Eid) सणानिमित्त बाजार भरला आहे. शेळ्या-मेंढ्याचे (Livestock) आवक कमी राहिल्याने बाजारात (Market) तेजी पाहायला मिळाली. बुधवारी (ता. ६) ८७ लाख ८० हजार रुपयांची उलाढाल बाजारात झाली.

कोरोना (Corona) विषाणूंमुळे मागील एक ते दीड वर्षात बकरी ईद सणाच्या पार्श्‍वभूमीवर मिरज येथील शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरला नव्हता.

२०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने एक वर्षे जनावरांचे बाजार बंद होते. गेल्या वर्षापासून जनावरांचे बाजार सुरू झाले असले, तरी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सणानिमित्त बाजार बंद ठेवण्यात आले होते.

बुधवारी (ता. २९) जून रोजी शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरला होता. त्या वेळी १२०० शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली. तर बुधवारी (ता. ६) १३२२ शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली.

जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत तालुक्यांसह कर्नाटकातून मिरज येथील जनावरांच्या बाजारात शेळ्या-मेंढ्यांची आवक झाली. बकऱ्यांचा दर सरासरी ११५०० ते ४१ हजार रुपये राहिला.

मिरजेचा बाजार हा पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कर्नाटक येथील खरेदीदार या ठिकाणी येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT