vaccination in animals` Agrowon
ॲनिमल केअर

Animal Vaccination : साथीचे रोग टाळण्यासाठी जनावरांना या लसी वेळेवर द्या

गाई, म्हशी व शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी घटसर्प, फऱ्या, फाशी व आंत्रविषार या साथीच्या रोगांमुळे तडकाफडकी दगावतात. या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही. परिणामी जनावरे दगावल्याने पशुपालकांच फार मोठ नुकसान होतं.

Team Agrowon

गाई, म्हशी व शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी घटसर्प, फऱ्या, फाशी व आंत्रविषार या साथीच्या रोगांमुळे तडकाफडकी दगावतात.  

या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही. परिणामी जनावरे दगावल्याने पशुपालकांच फार मोठ नुकसान होतं.

लाळ्या- खुरकूत (Foot And Mouth Diseases) रोगामुळे जनावरं सहसा मृत्युमुखी पडत नाहीत. परंतु या रोगामुळे विशेषतः संकरित गाई व म्हशी अनुत्पादक होतात किंवा त्यांची उत्पादन क्षमता घटते.

पर्यायाने पशुपालकास फार मोठा आर्थिक फटका बसतो. गाई, म्हशी व शेळ्या, मेंढ्यांतील आवश्यक लसीकरणाविषयी पशुसंवर्धन विभागाने दिलेली माहिती पाहुया. 

गाई, म्हशीतील लसीकरण 

१. घटसर्प - एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी. (संकरित गाईंना वर्षातून दोन वेळेस द्यावी) 

२. फऱ्या - एप्रिल मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी. 

३. फाशी - मे महिन्यात वर्षातून एक वेळेस द्यावी. ज्या भागात रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या भागातील जनावरांना द्यावी. 

४. लाळ्या खुरकूत - वर्षातून दोन वेळेस मार्च व सप्टेंबर महिन्यात द्यावी. (परंतु वर्षभर रोग प्रतिकारशक्ती टिकविणारी लस दिल्यास वर्षातून एक वेळेस सप्टेंबर महिन्यात द्यावी) 

शेळ्या मेंढ्यांमधील लसीकरण 

१. काळपुळी - वर्षातून एकदा फेब्रुवारी महिन्यात द्यावी. रोगग्रस्त भागात द्यावी. 

२. घटसर्प - वर्षातून एकदा मार्च महिन्यात द्यावी. 

३. आंत्रविषार - वर्षातून एकदा एप्रिल महिन्यात द्यावी. (दोन मात्रा पंधरा दिवसाच्या अंतराने द्याव्यात.) 

४. देवी - वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यात द्यावी.  गाभण शेळ्यांना ही लस देऊ नये. 

५. फऱ्या - वर्षातून एकदा मे महिन्यात द्यावी. 

कोणत्याही जनावराला लसीकरण करण्याच्या एक आठवडा अगोदर आंतर परजीवीच्या नायनाटासाठी जंतनाशकाची मात्रा द्यावी.  

जनावरांच्या शरीरावरील गोचीड, गोमाशा, उवा, लिखा व पिसवा या सारख्या बाह्य परजीवींच्या नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: कोल्हापूर जिल्ह्यातील १३१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा; फलोत्पादन अभियानांतर्गत ६०.८१ लाखांचे अनुदान मंजूर!

Human Culture: पेरणीतून उभी राहिली मानवी संस्कृती : प्रा. इंद्रजित भालेराव

Women Empowerment: रेशीम साडी विणकामातून महिलांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार

Onion Farmer Loss: कांदा उत्पादक उद्ध्वस्त! गेल्या चार महिन्यांत कांदा उत्पादकांचे ४०० कोटींचे नुकसान

Pre Monsoon Rain: सलग दुसऱ्या दिवशी मॉन्सूनपूर्व पावसाचा दणका

SCROLL FOR NEXT