Women Leadership  Agrowon
ॲग्रो विशेष

Women Sarpanch : बुलडाणा जिल्ह्यात ४३६ ग्रामपंचायतींत महिला राज

Gram Panchayat Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. शुक्रवारी झालेल्या महिला सरपंचपदाच्या सोडतीसाठी २०११ च्या लोकसंख्येचा विचार करीत आरक्षण निश्चित करण्यात आले.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या ८७० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महिला सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये जिल्ह्यात ४३६ ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार हे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (ता.२५) जिल्ह्यातील आरक्षण सोडत निघाली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने बुधवारी (ता.१६) आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे. त्यानंतर शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ८७० ग्रामपंचायतींमधील महिला सरपंचांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये ४३६ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती जाणार आहे.

या आरक्षण निश्चितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतींमध्येही उलटफेर होऊ घातला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे. शुक्रवारी झालेल्या महिला सरपंचपदाच्या सोडतीसाठी २०११ च्या लोकसंख्येचा विचार करीत आरक्षण निश्चित करण्यात आले.

आगामी काळात पाच वर्षांत जिल्ह्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतून ग्रामपंचायतींचे सरपंच ठरवले जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत निघाली.

या बैठकीस सहायक निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री ठाकरे, सहायक महसूल अधिकारी रामेश्वर जाधव व अन्य अधिकारी उपस्थित होते.या वेळी अनय पडोळ या बालकाच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या. डिसेंबर २०२५ मध्ये जिल्ह्यातील ६० टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून, त्यात याचा परिणाम दिसून येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Crisis: गॅस टंचाईवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल, 'एपस्टिन'चा उल्लेख, लोकसभेत प्रचंड गदारोळ

Satbara Distribution: एकाच दिवशी साडेतीन हजार सातबारांचे वाटप

Solar Pump Scheme Fraud: सौर कृषिपंप मिळवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

Sugarcane Weight Manipulation: कारखान्यांच्या वजन काट्यांप्रश्नी लोकायुक्तांकडे दाद मागणार

Agrowon Podcast: सोयाबीन स्थिरावले, कापूस आवक स्थिर, कारल्याचा भाव टिकून, कांदा दबावात, खरबुजाला उठाव

SCROLL FOR NEXT