Food Processing Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Food Processing : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत लाभार्थी अन्नप्रक्रिया महिला उद्योजकांनी व्यवसाय सुरू केले जात आहे. प्रक्रियेबरोबर स्वतःची विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक आहे.

Team Agrowon

Satara News : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत लाभार्थी अन्नप्रक्रिया महिला उद्योजकांनी व्यवसाय सुरू केले जात आहे. प्रक्रियेबरोबर स्वतःची विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. यामुळे उत्पादनास चांगला दर मिळणे शक्य आहे, असे मत राज्याचे कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटे यांनी व्यक्त केले .

शाहूनगर (ता. सातारा) येथील वैदिक मिलेट अन्नप्रक्रिया उद्योग भेटप्रसंगी श्री. आवटे बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, कृषी उपसंचालक सिद्धेश्वर मोकळे, तंत्र अधिकारी अनिल काळे, कृषी पर्यवेक्षक विनोद नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. आवटे पुढे म्हणाले, की जिल्ह्यात कृषी विभागाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत ८५४ अन्नप्रक्रिया युनिट उभारणी करून महिलांना गृहिणी ते सक्षम उद्योजिका बनवले ही समाधानाची बाब आहे.

परंतु या महिला उद्योजकांनी आपल्या उत्तम गुणवत्ता पूर्ण उत्पादनांची आकर्षक पॅकिंग करून, विविध माध्यमांतून प्रभावीपणे जाहिरात करून पुणे, मुंबई यांसारख्या महानगरातील बाजारपेठ काबीज करणे आवश्यक आहे. तेव्हाच आपले प्रक्रिया उद्योग इतर प्रस्थापित उद्योगाप्रमाणे २४ तास सुरू राहतील.

त्यासाठी कृषी विभाग सर्वोतोपरी मदत करण्यास तत्पर आहे. या प्रसंगी महिला उद्योजिका शुभांगी सोनावले यांनी मिलेट्स अर्थात पौष्टिक तृणधान्य राळा, नाचणीपासून बनवलेला मैदा विरहित सेंद्रिय गूळ व तुपातील कुकीज बिस्किट, ड्रायफ्रूट्स युक्त न्यूट्रीलाडू, नाचणीच्या शेवया, नुडल्स, ज्वारीचे पफ, ज्वारीचे व नाचणीचे पोहे, मिलेट् खाकरा आदी उत्पादनांची माहिती मान्यवरांना दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT