Kalammawadi Dam Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Kalammawadi Dam : राजू शेट्टी यांच्या इशाऱ्यानंतर सरकारला जाग? आज समिती करणार काळम्मावाडी धरणाच्या गळतीची पाहणी

Inspection of the Leakage of Kalammawadi Dam : चारच दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट काळम्मावाडी धरणावर जाऊन गळतीची पाहणी केली होती.

Aslam Abdul Shanedivan

Kalammawadi Dam News : राधानगरी येथील दूधगंगा धरण म्हणजेच काळम्मावाडी धरणावरून कोल्हापुरचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. धरणाच्या गळतीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आता सरकारला जाग आली आहे. आज (ता.२४) जलसंपदा विभागाकडून धरणाच्या गळतीची पाहणी केली जाणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून काळम्मावाडी धरणाला गळती लागली आहे. यामुळे या धरणात पाण्याची साठवणूक कमी केली जात आहे. ज्याचा फटका शेतकऱ्यांना उन्हाळ्यात बसतो. यावरून आरोप-प्रत्यारोप येथे पाहायला मिळतात.

शेट्टींचा धक्कादायक दावा

नुकताच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी धरणाच्या गळतीचा प्रश्न मांडला होता. राजू शेट्टी यांनी देखील शुक्रवारी (ता.२०) धरणाच्या गळतीवरून सरकारवर हल्लाबोल केला होता. यावेळी त्यांनी धरण प्रशासन गळतीची चुकीची माहिती देत असल्याचा आरोप केला होता. तसेच काळम्मावाडी धरणातून प्रतीसेकंद ३५० नाही तर ७०० लिटर पाण्याची गळती होत असल्याचा धक्कादायक दावा देखील शेट्टी यांनी केला होता.

यानंतर आता जलसंपदा विभागाला जाग आली असून विभागाकडून आज धरणाच्या गळतीची पाहणी केली जाणार आहे. गळती प्रतिबंधक कामाचे नियोजन करण्यासाठी १३ डिसेंबर २०२४ रोजी तज्ज्ञांची एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती आज धरणाला भेट देणार आहे.

८० कोटींचा निधी मंजूर

काळम्मावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न अनेकदा उठवला गेला आहे. तर गळती काढण्यासाठी ८० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. पण प्रत्यक्ष गळती काढण्याच्या कामाला सुरूवात नववर्षात होण्याची शक्यता आहे.

राजू शेट्टी यांचा दावा

दरम्यान शेट्टी यांनी धरणावर जाऊन पाहणी केली होती. त्यांनी, शासनाच्या आकडेवारीनुसार धरणाची गळती प्रति सेकंद ३५० लिटर आहे. मात्र प्रत्यक्षात धरणातून होणारी गळती प्रति सेकंद ६५० ते ७५० लिटर असल्याचा दावा केला त्यांनी केला होता. धरणाच्या गळतीचे प्रमाण वाढत असून संपूर्ण धरणाच्या भींतीला गळती लागली आहे. ही गळती ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारामुळेच लागली असून त्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आता लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी जनतेच्या हिताचा विचार करून गळती थांबवण्यासाठी तातडीने काम पूर्ण करावे, असे आवाहनही राजू शेट्टी यांनी केले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan Installment Date : पीएम किसानच्या हप्त्याची प्रतिक्षा कायम; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Agrowon Podcast: उडदाचे भाव दबावातच; बाजरीचे दर स्थिर, कोबी- मेथीचा भाव टिकून, फ्लाॅवर दर तेजीत

Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर अधिक राहणार

APMC SIT Investigation: नागपूर बाजार समितीच्या चौकशीसाठी एसआयटी

Cotton Farming : पूर्वहंगामी कापूस पिकाची वाढ जोमात

SCROLL FOR NEXT