Wagheri Market Yard  Agrowon
ॲग्रो विशेष

Wagheri Market Yard : मार्केट यार्डमुळे कोकणातील शेतीमालाला बाजारपेठ मिळेल

APMC Market : महायुती सरकार हे बळीराजाचे आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून सर्व काही मिळणार आहे. सरकारला १०० दिवस पूर्ण होत असताना मार्केट यार्डचे भूमिपूजन केले जात आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : वाघेरी मार्केट यार्डचे काम येत्या अठरा महिन्यांत पूर्ण होऊन कोकणातील शेतीमालाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल, असे मत पणन आणि राज शिष्टाचारमंत्री जयकुमार रावल यांनी येथे व्यक्त केले.

जिल्ह्यातील वाघेरी (ता. कणकवली) येथील १२ एकर जागेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून मार्केट यार्ड उभारले जात आहे. या मार्केट यार्डचे भूमिपूजन खासदार नारायण राणेंच्या हस्ते झाले.

या वेळी पालकमंत्री नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, तुळसीदास रावराणे आदी उपस्थित होते.

श्री. रावल म्हणाले, की महायुती सरकार हे बळीराजाचे आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून सर्व काही मिळणार आहे. सरकारला १०० दिवस पूर्ण होत असताना मार्केट यार्डचे भूमिपूजन केले जात आहे. पुढील अठरा महिन्यांत या मार्केट यार्डचे काम पूर्ण होईल.

मार्केट यार्डमुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला चांगला दर मिळणार आहे. आंबा, काजू, जांभूळ, करवंद, कोकम यांसह कोकणातील सर्वच उत्पादनांना बाजारपेठ मिळणार आहे. पालकमंत्री नीतेश राणे म्हणाले, की मार्केट यार्डमुळे मुंबईतील दलालांची साखळी मोडीत निघणार आहे. या मार्केट यार्डसोबतच बांदा आणि कुडाळ येथे उपसमित्यांच्या माध्यमातून विक्री व्यवस्था निर्माण केली जाईल.

...या केल्या घोषणा

मार्केट यार्डकरिता केंद्रांतून १ कोटीचा निधी

व्यापाऱ्यांना परवानाधारक करणार

जिल्ह्यासाठी पाच कोल्ड ट्रक देणार

आंबा महोत्सवासाठी राज्य शासन १ लाख देणार

भातविक्रीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Textile Park: यवतमाळ जिल्ह्यातील टेक्स्टाईल पार्कला मिळेना गती

Agrowon FPC Conference: नव्या दिशांवर झाले विचारमंथन

ED Files Chargesheet: रिलायन्स पॉवर, उपकंपन्यांविरुद्ध आरोपपत्र

Sugar Industry: दौंडमध्ये कारखान्यांचे ऊसदराबाबत मौनच

Custom Structure: पुढचे लक्ष्य आता सीमाशुल्क ‘शुद्धीकरणा’चे : निर्मला सीतारामन

SCROLL FOR NEXT