Karad News : ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत एक कोटीचे बक्षीस पटकाविलेल्या राज्यातील पहिल्या सौरग्राम ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीत ‘फटाकेमुक्त गाव’ ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. दिवाळीसह सण, उत्सव अगर अन्य प्रसंगात फटाके वाजविल्यास दोन हजारांचा दंड संबंधितांकडून वसूल केला जात आहे. प्रदूषण रोखून पर्यावरण रक्षणाला हातभार लावण्यासाठी यंदाही ती परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे.
विविध स्पर्धा आणि अभियानातून सहभाग नोंदवून आतापर्यंत ७६ पुरस्कारांची मानकरी ठरलेल्या मान्याचीवाडीत राबविण्यात येत असलेल्या अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना अन्य गावांसाठी दिशादर्शक ठरत आहेत.
प्रदूषणमुक्तीतून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीला हातभार देण्यासाठी फटाकेमुक्त गावची संकल्पना तेथे अनेक वर्षांपासून राबविली जात असून, चार वर्षांपासून माझी वसुंधरा अभियानात गावचा सहभाग झाल्यानंतर तर त्याची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी तेथे सुरू झाली आहे. ‘ग्रामसभा ठरावाने फटाके वाजविण्यास बंदी घातली असून, उल्लंघन केल्यास दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाईल,’ अशा सूचना फलक गावच्या प्रवेशद्वारावरच लावला आहे.
सरपंच रवींद्र माने म्हणाले, ‘‘फक्त दिवाळीपुरतेच नव्हे, तर अन्य उत्सवात, तसेच मिरवणुकीतही फटाके वाजविण्यास येथे बंदी आहे. मालदन पंचक्रोशीचे जागृत देवस्थान श्री वडजाईदेवीच्या मंदिरात लग्नानंतर वरातीने जोडपी दर्शनास येतात. मात्र, फटाके वाजविले जात नाहीत.’’
फटाके वाजविल्याने होणारे हवा व ध्वनिप्रदूषण, तसेच आरोग्याची होणारी हानी यासंदर्भात आम्ही विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये सतत जागृती करत असतो, त्याचाही चांगला परिणाम दिसून येतो आहे. येथे हवेची गुणवत्ताही नियमित तपासली जाते.रवींद्र माने सरपंच, मान्याचीवाडी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.