Market Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Bharat Barad Sell : सरकार ऑक्टोबरपासून पुन्हा सवलतीच्या दरात तांदूळ, गहू पीठ, डाळींची विक्री करणार

Anil Jadhao 

Pune News : किरकोळ बाजारात सवलतीच्या दरात कांदा विक्री सुरु केल्यानंतर सरकार ऑक्टोबरपासून भारत ब्रॅंडखाली तांदूळ, गहू पीठ, डाळींची विक्री सुरु करु शकते. मंत्री समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. सरकारने आधीच ३५ रुपये किलोने कांद्याची विक्री सुरु केली आहे.  

सरकारने मागील काळात सवलतीच्या दरात विक्री केली होती. अन्नधान्याची महागाई कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला होता. सरकार पुन्हा सवलतीच्या भावात अन्नधान्याची विक्री करू शकते. कारण नुकत्याच झालेल्या मंत्रि समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात काही अन्नधान्याची विक्री सवलतीच्या दरात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते सवलतीच्या दरात अन्नधान्य विक्रीला हरवा कंदील मिळू शकतो. पण ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विक्रीत सरकार भाव जास्त ठेऊ शकते. याआधी सरकारने भारत डाळ ब्रॅंडखाली हरभरा डाळ ६० रुपये किलोने विकली होती. आता मात्र हरभरा डाळीचा भाव ७० रुपये किलो राहू शकतो. तर मूग डाळीचा भाव कायम राहून १०७ रुपये किलो राहणार आहे. तर मसूर डाळ आता ८९ रुपये प्रतिकिलोने विकली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

तसेच गहू पीठ आणि तांदळाच्या विक्रीचा भावही वाढवला जाऊ शकतो. आधी फेब्रुवारीमध्ये सराकरने जेव्हा सुरुवातील भारत तांदळाची विक्री सुरु केली होती तेव्हा तांदळाचा भाव २९ रुपये प्रतिकिलो ठेवण्यात आला होता. तसेच ५ किलो आणि १० किलोच्या पॅकेटमध्ये तांदूळ मिळायचा. पण आता सरकार १० किलोमध्ये तांदूळ विकू शकते आणि  या १० किलोच्या पॅकेटची किंम ३४० रुपये राहू शकते. 

भारत आटा ब्रॅंडखालील गव्हाच्या पिठाचेही भाव वाढू शकतात. गव्हाचे पीठ यापुर्वी १० किलोच्या पॅकेटमध्ये मिळत होते. तसेच प्रतिकिलो २७ रुपये किंमत होती. म्हणजेच १० किलोचे पॅकेट २७० रुपयाला मिळत होते. पण आता किंमत वाढू शकते आणि किंमत ३०० रुपये प्रति १० किलो राहू शकते. म्हणजेच सरकार गव्हाच्या पिठाचा भाव किलोमागे ३ रुपयाने वाढवण्याच्या विचारात आहे, अशी माहितीही सुत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakawadi Dam : जायकवाडीतील विसर्गात घट-वाढ सुरूच

Healthy Millets : बहुगुणी भरडधान्य

Interview with Dr. B. V. Mehta : सोयाबीनचा तिढा निश्‍चितच सुटू शकतो...

Indian Agriculture : जुने हवे ते नवनिर्मितीसाठी...

Sugarcane Farming : ऊस शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT