Animal Husbandry Department agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Animal Department : पशुसंवर्धनच्या योजनांचा लाभ घ्या : डॉ. प्रमोद बाबर

Kolhapur Animal Cattle Breeder : कोल्हापूर जिल्ह्यातील पशुCattle breederपालक शेतकरी , सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावेत.

sandeep Shirguppe

Kolhapur ZP : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत विविध वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येणार आहे. या विविध लाभाच्या योजनांसाठी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया २०२५-२६ या वर्षात राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील पशुपालक शेतकरी , सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी केले आहे.

या बाबत डॉ. बाबर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत, त्यांना शाश्वत अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध करुन देत पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांव्दारे ग्रामीण भागाचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याच्या प्रयत्न केला आहे.

जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनाकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतीक्षायादी पुढील ५ वर्षांपर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे.वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर २ दुधाळ जनावरांचा गट वाटप करणे.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना १ लक्ष ३४ हजार ४४३ रुपयांच्या मर्यादेत २ म्हैशी किंवा १ लक्ष १७ हजार ६३८ रुपयाच्या मर्यादेत २ संकरित गायींचा गट वाटप करण्यात येणार आहे. विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १०+१ शेळी गट वाटप करणे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७७ हजार ६५९ रुपयाच्या मर्यादेत १०+१ शेळी गट वाटप करण्यात येणार आहे.

आदिवासी घटक योजनेअंतर्गत मिळणारे लाभ

जिल्हा आदिवासी घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर १०+१ शेळी गट वाटप करणे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना ७७ हजार ६५९ रुपयाच्या मर्यादेत १०+१ शेळी गट वाटप करण्यात येणार आहे. या सर्व योजनांमध्ये महिला लाभार्थीसाठी ३३ टक्के व अपंग लाभार्थ्यांसाठी ५ टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Textile Park: यवतमाळ जिल्ह्यातील टेक्स्टाईल पार्कला मिळेना गती

Agrowon FPC Conference: नव्या दिशांवर झाले विचारमंथन

ED Files Chargesheet: रिलायन्स पॉवर, उपकंपन्यांविरुद्ध आरोपपत्र

Sugar Industry: दौंडमध्ये कारखान्यांचे ऊसदराबाबत मौनच

Custom Structure: पुढचे लक्ष्य आता सीमाशुल्क ‘शुद्धीकरणा’चे : निर्मला सीतारामन

SCROLL FOR NEXT