Kanifnath Yatra Madhi Agrowon
ॲग्रो विशेष

Madhi Yatra : मढीत मानाची होळी पेटवून कानिफनाथ मुख्य यात्रेला सुरुवात

Kanifnath Yatra Madhi : मढी येथील चैतन्य कानिफनाथ गडाच्या बांधकामासाठी दगडी काम व मोठी दगडी शिळा, पाषाण आदींची वाहतूक करत गडाच्या उभारणीसाठी गोपाळ समाजाने मोठे कष्ट घेतले.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : सुमारे ४७३ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेली व राज्यात एक वेगळी ओळख असलेली मढी येथील मानाची होळी गुरुवारी सायंकाळी (ता.१३) गोपाळ समाजातील मानकऱ्यांच्या हस्ते पेटविण्यात आली. या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मढी येथील चैतन्य कानिफनाथ गडाच्या बांधकामासाठी दगडी काम व मोठी दगडी शिळा, पाषाण आदींची वाहतूक करत गडाच्या उभारणीसाठी गोपाळ समाजाने मोठे कष्ट घेतले.

त्यामु‌ळे मढी येथील सार्वजनिक होळी पेटवण्याचा मान राज्यातील गोपाळ समाजाला देण्यात आला आहे. राज्यातील गोपाळ समाजाचे कानिफनाथ हे कुलदैवत असून, या समाजाची मोठी श्रद्धा नाथांवर आहे. तसेच अठरापगड जातींचे भटके समाज आजही नाथांची अत्यंत श्रद्धेने सेवा करतात. २५ वर्षांपूर्वी होळी पेटविण्यावरून मानापानाची लढाई मुद्द्यांवरून गुद्यावर आली होती. त्यामुळे बरीच वर्षे होळीची प्रथा बंद राहिली.

त्यानंतर न्यायालयातून निवाडा करत प्रतीकात्मक स्वरूपात गावातील दत्त मंदिराच्या बारवेजवळ प्रशासनाने ठरवून दिलेल्या जागेवर होळी पेटविण्याचो प्रथा सुरू झाली. गुरुवारी सायंकाळी गोपाळ समाजातील मानकरी माणिक लोणारे (रा. येवला), नामदेव माळी (गेवराई), रघुनाथ काळापहाड (पाथडी), हरिभाऊ गव्हाणे (बेलगाव), भागिनाथ नवघरे (कोळपेवाडी) या मानकऱ्यांना देवस्थान समितीने मानाच्या गोवऱ्या दिल्या.

गोपाळ बांधव नाथांचा जयजयकार करत गडावर पोहोचले. तेथे देवस्थान समितीतर्फे त्यांचा सन्मान करत गोवऱ्या देण्यात आल्या. समाजाचे मानकरी ज्ञानदेव गिन्हे (शिरूर) यांना पागपर्यंत गोवऱ्या डोक्यावर घेऊन मिरवण्याचा मान आहे. त्यामुळे त्यांनी नाथांच्या मंदिरापासून या गोवऱ्या डोक्यावर घेतल्या.

गडावरून वाजत गाजत या गोवऱ्या दत्त मंदिराजवळ नियोजित जागी आणण्यात आल्या. तेथे पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेले होते. पारंपरिक पद्धतीने सायंकाळी पाच पाजण्याच्या सुमारास मानकऱ्यांनी होळी पेटवली. तहसीलदार उद्धव नाईक, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, यांच्यासह पोलिस अधिकारी, नागरिक उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Farmer Issue: उसाला तुरे आल्याने शेतकरी चिंतेत

Agriculture Storage Subsidy: कांदाचाळ, लसूण साठवणूक गृहासाठी शासन देणार अनुदान

Rabi Season: चंद्रपूर जिल्ह्यात रब्बी क्षेत्र पोहोचले ५३ हजार हेक्टरवर

Soil Health: मानवाच्या आरोग्यासाठी जमिनीचे आरोग्य जपा : नानोटे

Solapur Milk Union: संचालक मंडळाच्या बरखास्तीवर सहा महिन्यांत निर्णय द्या

SCROLL FOR NEXT