Cotton Production Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production : कापूस उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे

Cotton Production Management : कापूस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सूक्ष्म नियोजन, एकात्मिक कीड व्यवस्थापन या सर्व बाबी योग्य वेळेत करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

यवतमाळ : कापूस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सूक्ष्म नियोजन, एकात्मिक कीड व्यवस्थापन या सर्व बाबी योग्य वेळेत करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी व्यक्त केले. ‘ॲग्रोवन’च्या वर्धापन दिवसानिमित्त इफ्को प्रायोजित ‘कापूस पीक व्यवस्थापन’ या विषयावरील ‘ॲग्रोसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन कोठा (वेणी) (ता. कळंब) येथे करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला संदीप कदम (वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी संशोधन केंद्र यवतमाळ), राहुल चव्हाण (विषय विशेषतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ), अविनाश सूर्यवंशी (मंडळ कृषी अधिकारी, कळंब), संतोष फलटणकर (क्षेत्र अधिकारी इफको), सरपंच पुरुषोत्तम ढोले, प्रयोगशील शेतकरी सुनील बोधडे यांची उपस्थिती होती.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे पुढे म्हणाले, की शेतकऱ्यांनी कापूस पीक लागवड करताना हवामानाच्या अंदाजानुसार पीक व्यवस्थापनावर भर द्यावा, एकात्मिक कीड व्यवस्थापन, ठिबकचा वापर करावा. हवामानात होणारा बदल आणि मजूर समस्या ही आजची शेतकऱ्यांसाठी असलेली मोठी अडचण आहे. शेतकऱ्यांनी यावर उपाय म्हणून यांत्रिकीकरणाकडे वळणे गरजेचे असल्याचे राहुल चव्हाण यांनी विषद केले त्यासोबतच मजूर समस्यावर मात करण्यासाठी ड्रोन द्वारे फवारणीचे महत्त्व त्यांनी सांगितले.

पिकाचा लागवड कालावधी आणि व्यवस्थापन साधल्यास अपेक्षित उत्पादकता मिळविता येते असे मत संदीप कदम यांनी व्यक्त केले. जमिनीचा गर्भ हा देखील उत्पादकता वाढीत महत्त्वाचा ठरतो असे ते म्हणाले. इफ्कोचे क्षेत्र अधिकारी संतोष फलटणकर यांनी इफ्को कंपनी विषयी व कंपनीच्या माध्यमातून चालणाऱ्या उपक्रमांची उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातील विविध शासकीय योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी अविनाश सूर्यवंशी यांनी दिली.

कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ ऐवजी वृक्ष देऊन करण्यात आले. यावेळी शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक केशव निमकर, नामदेव चारमोडे, सुशीला चाफले, सुनील बोदडे, राजाभाऊ धोटे, शंकर शिंगोटे या प्रयोगशील शेतकऱ्यांचा यावेळी ‘ॲग्रोवन’च्या वतीने सन्मान करण्यात
आला.  चर्चासत्राचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक दिनेश उगले यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲग्रोवन वितरण प्रतिनिधी धम्मशील शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वि. के. गायकवाड (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, आत्मा कळंब), केशव निमकर, पवन कदम, अखिल शेख, श्याम दांडेकर, सुनील कांबळे यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Compensation: शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत ऐंशी जणांना मदत

Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरमार्गे होण्यासाठी आंदोलनाचा निर्णय

Fertilizer Management: माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे

Sugarcane Farmer Issue: उसाला तुरे आल्याने शेतकरी चिंतेत

Agriculture Storage Subsidy: कांदाचाळ, लसूण साठवणूक गृहासाठी शासन देणार अनुदान

SCROLL FOR NEXT