Maize Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Kharif Season: गेल्या वर्षी बाजरी, कापसाला पुरेसा दर मिळाला नसल्याचा फटका यंदा खरिपात बसण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. यंदा आतापर्यंतच्या खरीप पेरणीनुसार मक्याचे क्षेत्र वाढीचा अंदाज आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News: गेल्या वर्षी बाजरी, कापसाला पुरेसा दर मिळाला नसल्याचा फटका यंदा खरिपात बसण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. यंदा आतापर्यंतच्या खरीप पेरणीनुसार मक्याचे क्षेत्र वाढीचा अंदाज आहे. गत वर्षीपेक्षा यंदा २ लाख ७८ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर अधिक पेरा झाला आहे. कापूस लागवड, बाजरीच्या पेरणीचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा आतापर्यंत तरी यंदा कमीच आहे.

राज्यात खरिपाचे १४४ लाख ३६ हजार ५४ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, आतापर्यंत (७ जुलै) १०७ लाख ९६ हजार ३९५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा लवकर झालेल्या पावसामुळे मूग, उडदाचे क्षेत्र काहीसे वाढले आहे. मुगाचे ३,०२,४५९ सरासरी क्षेत्र असून, यंदा १,७८,२४४ हेक्टरवर पेरणी झाली.

गेल्या वर्षी १,९४,८२७ हेक्टरवर पेरणी झाली होती. उडदाचे ३,५९,३२९ हेक्टर सरासरी क्षेत्र असून यंदा २,९८,०९९ हेक्टरवर पेरणी झाली. गेल्या वर्षी २,९२,१३४५ हेक्टरवर पेरणी झाली होती. मक्याचे ९,३३,८१९ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, यंदा आतापर्यंत ११,२३,९४९ हेक्टरवर पेरणी झाली असून, गेल्या वर्षी आतापर्यंत ८ लाख ४५ हजार ६०४ हेक्टरवर पेरणी झाली होती.

राज्यात यंदा मक्याचा २ लाख ७८ हजार ३४५ हेक्टर क्षेत्रावर गतवर्षीपेक्षा अधिक पेरा झाला आहे. तर, यंदा तुरीची कमी गत वर्षीपेक्षा पेरणी झाली आहे. तुरीचे १२,७७,१२३ हेक्टर सरासरी क्षेत्र असून ९,८४,३९६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी ९,९४,४०५ हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीनचीही यंदा गतवर्षीपेक्षा काहीशी कमी पेरणी झाली आहे. सोयाबीनचे ४७,२१,४८८ हेक्टर सरासरी क्षेत्र असून आतापर्यंत राज्यात ४० लाख ६० हजार ४१४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

गतवर्षी ४३,१९,४६६ हेक्टरवर पेरणी झाली होती. आतापर्यंतचा विचार केला तर गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीनची पेरणी कमी झाली आहे. बाजरी, कापसाचे क्षेत्र यंदा कमी राहण्याचा अंदाज आहे. बाजरीची यंदा गतवर्षीपेक्षा कमी पेरणी झाली आहे. बाजरीचे ४,८१,६८६ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, आतापर्यंत २ लाख ४५ हजार १४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षी ३ लाख ४५ हजार ४६१ हेक्टरवर पेरणी झाली होती.

कापसाचे ४२,४७,२१२ हेक्टर सरासरी क्षेत्र असून आतापर्यंत ३३ लाख ६९ हजार ७३० हेक्टरवर लागवड झाली आहे. गतवर्षी ३६ लाख ७४ हजार ३९३ हेक्टरवर लागवड झाली होती. आतापर्यंतचा विचार करता कापसाचे गतवर्षीपेक्षा यंदा तीन लाख ४ हजार हेक्टर क्षेत्र कमी आहे, तर आतापर्यत झालेल्या पेरणीचा कल पाहता मक्याचे क्षेत्र अधिक वाढणार असे दिसते आहे.

पावसाच्या दडीमुळे पेरण्या कमीच

राज्यातील काही भागांचा अपवाद वगळता बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब आहे. अधूनमधून सरी येत असल्या तरी त्याचा पेरणीसाठी फारसा फायदा होताना दिसत नाही. आतापर्यंत राज्यात सरासरीच्या ७४ टक्के पेरणी झाली आहे. गतवर्षी या काळात ७६ टक्के पेरणी झाली होती. मे मधील पावसाने शेतीची कामे लवकर उरकली. जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने पेरण्यांना वेग आला. मात्र काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरण्यांना अडथळे येत असून, पेरणी झालेल्या भागांतही पावसाची आशा लागल्याचे शेतकरी सांगत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Compensation: शेतकरी अपघात सुरक्षा योजनेअंतर्गत ऐंशी जणांना मदत

Nashik Pune Railway: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेरमार्गे होण्यासाठी आंदोलनाचा निर्णय

Fertilizer Management: माती परीक्षण अहवालानुसार खत व्यवस्थापन करावे

Sugarcane Farmer Issue: उसाला तुरे आल्याने शेतकरी चिंतेत

Agriculture Storage Subsidy: कांदाचाळ, लसूण साठवणूक गृहासाठी शासन देणार अनुदान

SCROLL FOR NEXT